Video: Congress MLA Sunil Kedar threatens villagers viral video on Social Media | Video: काँग्रेस आमदार सुनील केदार यांची गावकऱ्यांना धमकी; भाजपाचा झेंडा लावाल तर... 
Video: काँग्रेस आमदार सुनील केदार यांची गावकऱ्यांना धमकी; भाजपाचा झेंडा लावाल तर... 

सावनेर - विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या राज्यात जोरदार वाहू लागलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करताना पाहायला मिळत आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपात प्रवेश करण्यासाठी नेत्यांची रांग लागून राहिली आहे. या निवडणुकीच्या वातावरणात काँग्रेस आमदार सुनील केदार यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओत सुनील केदार हे भाजपाच्या कार्यकर्त्यांना धमकाविताना पाहायला मिळत आहे. सिलेवाडा गावातील एका सभेत सुनील केदार भाषण करत होते. त्यावेळी गावकऱ्यांसमोर सुनील केदार यांनी जर सिलेवाडा गावात जे जे लोक भाजपाचे झेंडे लावून फिरतात त्यांना टार्गेट करत जर यापुढे मस्ती केली तर घरात घुसून मारेन अशा प्रकारे धमकी दिल्याचा व्हिडीओत दिसून येतं. 
 

Web Title: Video: Congress MLA Sunil Kedar threatens villagers viral video on Social Media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.