फहीम खान लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारत-पाकिस्तान युद्धाची शक्यता वाढली असताना, देशाला आपली लष्करी ताकद मजबूत करण्याची आवश्यकता आहे. अशावेळी विदर्भ एक मजबूत आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे. हा प्रदेश केवळ शस्त्रास्त्र कारखान्यांच्या रूपात देशाला दारूगोळाच पुरविणार नाही, तर येथील संरक्षण संस्था, तज्ज्ञ आणि लष्करी कार्यालये युद्धाच्या प्रत्येक आघाडीवर सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून उभी राहतील. वायुसेनेचे एअर मार्शल विभास पांडे (निवृत्त) यांनी 'लोकमत'शी खास संवाद साधताना विदर्भाच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
दारूगोळ्याची राजधानी : विदर्भातील शस्त्र कारखाने सेनेची ताकदविदर्भात भारत सरकारचे अंबाझरी (नागपूर), भंडारा, भद्रावती (चंद्रपूर) आणि पुलगाव (वर्धा) हे चार प्रमुख शस्त्र निर्मिती कारखाने आहेत. युद्धाच्या काळात, भारतीय सैन्याला आवश्यक असलेला दारूगोळा आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा अखंडित असेल. या कारखान्यांमधील चांगल्या समन्वयामुळे उत्पादन आणि पुरवठ्याचा वेग वाढेल. युद्धादरम्यान, या कारखान्यांमधून मिळणाऱ्या साहित्यामुळे सैनिकांची ताकद आणखी वाढेल.
हवाई सुरक्षा : नागपूरस्थित वायुसेना मेंटेनन्स कमांड पूर्णपणे सज्जभारतीय हवाई दलाचे मेंटेनन्स कमांड मुख्यालय नागपूर येथे आहे. अनेक बेस रिपेअर डेपो (बीआरडी) आणि इक्विपमेंट डेपो (ईडी) या अंतर्गत येतात. येथून, विमाने, हेलिकॉप्टर आणि इतर विमान शस्त्रांच्या दुरुस्ती आणि देखभालीत गुंतलेल्या तज्ज्ञांच्या टीम युद्धादरम्यान थेट युद्धभूमीवर जाऊन काम करतील. एअर मार्शल (निवृत्त) विभास पांडे यांच्या मतें, यामुळे सपोर्ट फोर्सची ऑपरेशनल क्षमता दुप्पट होईल.
भूदल ताकद : नागपूरचे उपक्षेत्र कार्यालय आणि गाईस रेजिमेंट सेंटरनागपूरला नुकतेच स्थानांतरित झालेले उत्तर महाराष्ट्र आणि गुजरातचे उपक्षेत्र कार्यालयदेखील युद्धादरम्यान महत्त्वाची भूमिका बजावेल. या भागातील सर्व लष्करी उपक्रम या कार्यालयातून चालवले जातील. त्याचवेळी, कामठी येथील गाईस रेजिमेंट सेंटरमध्ये प्रशिक्षित सैनिकांची तुकडी कोणत्याही परिस्थितीत युद्धासाठी सज्ज असेल.
खासगी उद्योगांचीही युद्धात भूमिकाया राष्ट्रीय आपत्तीत विदर्भातील सोलर इंडस्ट्री आणि इतर खासगी संरक्षण उद्योगही मागे राहणार नाहीत. त्यांचे तांत्रिक समर्थन, नवोन्मेष आणि उत्पादन क्षमता संरक्षण क्षेत्रासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तज्ज्ञांच्या मते, या कठीण काळात विदर्भाची देशभक्ती आणि तांत्रिक क्षमता राष्ट्राला बळकटी देईल.
विदर्भ मागे राहणार नाही, समोरून नेतृत्व करेलभारत-पाकिस्तान युद्ध झाल्यास, जेव्हा संपूर्ण देश सीमेवर एकजूट होईल, तेव्हा विदर्भकेवळ मागून पाठिंबा देऊनच नव्हे तर तांत्रिक, औद्योगिक आणि धोरणात्मक पातळीवर नेतृत्व करून भारतीय सैन्याचा विश्वासार्ह भागीदार असल्याचे सिद्ध करेल.