शहरं
Join us  
Trending Stories
1
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
2
Nagpur: आईच्या अंत्यसंस्कारादरम्यान मिळाला एबी फॉर्म; काळजावर दगड ठेवून गाठलं निवडणूक कार्यालय!
3
Nagpur: शिंदेसेनेला आठ जागा, पण सहा उमेदवार भाजपचेच; अखेरच्या दिवशी संपविला सस्पेन्स
4
वर्षाचा शेवटही एकदम झक्कास! भारतीय महिला संघाने ५-० अशा मालिका विजयासह श्रीलंकेचा उडवला धुव्वा
5
Nagpur: भाजपला बालेकिल्ल्यातच खिंडार! नागपूरमध्ये एकसोबत ४२ कार्यकर्त्यांचा राजीनामा
6
"शिंदेसेनेनेच युती तोडली, आम्ही तर दहा दिवसांपासून...", भाजपा नेत्याने ठरलेले जागावाटपही सांगून टाकले
7
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
8
दीप्ती शर्मानं रचला इतिहास! आता आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्यातही 'नंबर वन'
9
शिंदेसेनेने १४ विद्यमान नगरसेवकांना नाकारली उमेदवारी; कुणाला डावलले, कुणाला मिळाले तिकीट?
10
Viral Video: "मॅडम असं करू नका!", प्रवासी तरुणीचं कॅब चालकासोबत चुकीचं वर्तन, काय केलं?
11
IND W vs SL W: हरमनप्रीतची कडक फिफ्टी; अरुंधतीनं तर २४५ च्या स्ट्राईक रेटनं धावा करत लुटली मैफील
12
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
13
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
14
निर्मात्याकडून एका रात्रीची ऑफर, भररस्त्यात गोंधळ... सूर्याचं नाव घेणारी खुशी मुखर्जी कोण?
15
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
16
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
17
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
18
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
19
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
20
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरेकडील गार वाऱ्याने विदर्भ गारठला ! आठवडा ठरला यंदाचा सर्वांत थंड; जानेवारीत तापमानाचा काय अंदाज ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 19:49 IST

Nagpur : काश्मिरात ४० दिवसांच्या कडाक्याच्या थंडीचा कालावधी म्हणजेच 'चिलाई कलान'ला २१ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या नैसर्गिक बदलाचा थेट परिणाम म्हणजे उत्तर भारतातून गार वारे वाहून महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काश्मिरात ४० दिवसांच्या कडाक्याच्या थंडीचा कालावधी म्हणजेच 'चिलाई कलान'ला २१ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. या नैसर्गिक बदलाचा थेट परिणाम म्हणजे उत्तर भारतातून गार वारे वाहून महाराष्ट्रातही थंडीची लाट आली आहे. तसे यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात सर्वाधिक थंड दिवसाची नोंद करण्यात आली.

पहिल्या आठवड्यापासून थंडीचा प्रकोप वाढला आहे. दुसरा व चौथा आठवडा तर प्रचंड थंडीचा ठरला. विशेष म्हणजे येत्या जानेवारीमध्येही तापमान सरासरीच्या खाली राहील, असा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

काश्मीर, उत्तरेकडील गार वाऱ्याने शहरही गारठले

सध्या काश्मिरसह उत्तर भारतामध्ये जबरदस्त थंड लाटेची स्थिती आहे. काश्मिरमध्ये तापमान मायनसवर असून पंजाबची काही शहरे सतत ५ अंशांच्या खाली आहेत. उत्तर व पूर्वोत्तर राज्यात धुक्याची चादर पसरली आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या वाऱ्याने विदर्भाची शहरे गारठली आहेत, ज्यामध्ये नागपूरचाही समावेश आहे.

हा आठवडा ठरला यंदाचा सर्वांत गार

डिसेंबरचा दुसरा व चौथा आठवडा सर्वाधिक थंडीचा ठरला. त्यातही दुसऱ्या आठवड्यात १० डिसेंबर रोजी मोसमातील सर्वांत कमी ८ अंश तापमानाची नोंद झाली. या आठवड्यात ७ रोजी ८.५ अंश, ८ रोजी ९.६ अंश, ९ रोजी ८.८ अंश, १० ला ८ अंश, ११۹ रोजी ८.१ अंश आणि १२ व १३ रोजी १० अंश किमान तापमानाची नोंद झाली.

यंदाचा १० डिसेंबरला वर्षातील नीचांकी तापमान

यंदा १० डिसेंबरला सर्वांत कमी ८ अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली. मात्र, यापूर्वी २०१८ साली २९ डिसेंबरला रात्रीचा पारा ३.५ अंशांवर गेला होता, जो शतकातील थंडीचा विक्रम आहे. २०२१ व २०२४ या वर्षातही यंदापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.

नववर्षाचे स्वागत गारठ्याने होणार

उत्तरेकडे वाढलेली थंडी पाहता सध्यातरी गारठ्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार पुढचे काही दिवस किमान तापमान १० अंशांच्या खाली-वर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नववर्षाचे स्वागत गारठ्यानेच करावे लागेल, असा अंदाज आहे.

थंड वाऱ्यांमुळे सर्दी-तापाने शहर बेजार : डिसेंबर महिन्यात सातत्याने तापमान सरासरीच्या खाली राहिले आहे. त्यातही उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे आरोग्यावर परिणाम दिसून येत आहे. घरोघरी सर्दी, ताप आणि खोकल्याचेही रुग्ण वाढले आहेत.गहू, हरभरा पिकांना फायदा : सध्या आकाश निरभ्र आहे, ढगाळ वातावरण नाही. याचा लाभ शेतातील पिकांना होत असतो. शेतक-यांच्या शेतात गहू, हरभरा आहे.

जानेवारीत तापमानाचा काय अंदाज ?

डिसेंबरला कडाक्याची थंडी सहन केल्यानंतर जानेवारीमध्ये हळूहळू पारा वाढून नागपूरकरांना गारठ्यापासून दिलासा मिळतो. यंदा मात्र कमाल आणि किमान तापमान सरासरीच्या खाली राहणार आहे. त्यामुळे गारठ्याचा त्रास कमी-अधिक प्रमाणात कायम राहणार, असा हवामानतज्ज्ञांचा अंदाज आहे.

आठवड्यातील तापमान

तारीख           किमान         कमालरविवार २१       ८.६            २८.६सोमवार २२      ८.२            २८मंगळवार २३    ९.२            २८.३बुधवार २४       ९.६            २९.२गुरुवार २५      १०.६           २८.८शुक्रवार २६     ११.२            २८शनिवार २७    १०.६           २७.८

"नागपूरला २०१८ साली पडलेल्या थंडीचा विक्रम अबाधित आहे. यंदा आतापर्यंत ८ अंश नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मात्र, यंदा अनेक वर्षांनंतर थंडीच्या दिवसांची संख्या अधिक होती. सर्व दिवस तापमान सरासरी खाली होते व दोन आठवडे थंड लाटसदृश्य स्थिती होती. पुढचे दोन महिने, म्हणजे फेब्रुवारीपर्यंत पारा सरासरीच्या खाली राहून थंडी जाणवत राहील, अशी शक्यता आहे."- डॉ. रिझवान अहमद, हवामान अधिकारी, प्रादेशिक हवामान विभाग

English
हिंदी सारांश
Web Title : North Winds Freeze Vidarbha; Coldest Week This Year; January Forecast?

Web Summary : Vidarbha shivers as cold northern winds sweep in. December recorded the lowest temperature this year. The chill is expected to persist in January, with temperatures remaining below average. Nagpur experienced a notably cold week and citizens are facing cold, cough and fever. Farmers are benefiting from clear weather.
टॅग्स :weatherहवामान अंदाजnagpurनागपूरVidarbhaविदर्भWinterहिवाळा