शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

ज्येष्ठ साहित्यिक आशाताई सावदेकर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 13:05 IST

Nagpur news; ज्येष्ठ साहित्यिक आशाताई सावदेकर यांचे आज सकाळी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक आशा सावदेकर यांचे येथे गुरूवारी सकाळी निधन झाले. त्या ७२ वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा आश्विन सावदेकर आहे. तो अमेरिकेत डेनव्हर येथे राहतो.आशा सावदेकर यांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून विस्मरण झाले होते. तेव्हापासून त्या सोनेगाव एचबी ईस्टेट परिसरातील विहिनीसोबत राहात होत्या. त्यांच्या देखभालीसाठी एक केअरटेकर ठेवली होती. सावदेकर यांच्यावर वैयक्तिक आपत्ती कोसळल्या. मुलगी अपर्णा दासगुप्ता हीचे हृदयविकाराने निधन झाल्यानंतर त्या मानसिकरीत्या खूप खचल्या होत्या. पती अरविंद सावदेकर यांचे आठ दहा वर्षापूर्वी निधन झाले. आशाताईंना औषध तसेच श्वास घेण्याचेही विस्मरण होत होतं. त्यांचे वैद्यकीय देखभाल त्याचे स्नेही डाक्टर निखिल करीत होते. सावदेकर यांची कोरोना चाचणी व्हायची होती. डाक्टर निखिल हेच अंत्यसंस्कार करतील असे कौटुंबिक स्नेही आशा बगे यांनी सांगितले. त्यांचा नातु मुंबई येथे शिकत आहे.डॉ.आशा सावदेकर मूळच्या नागपूरच्या असून त्यांचे माहेरचे नाव आशा गजानन भवाळकर आहे. नागपूर येथील भिडे कन्याशाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण, तर तिथल्याच नागपूर महाविद्यालयातून त्या १९६८ साली बी.ए. व १९७० साली एम.ए.(मराठी) झाल्या. १९७५ साली त्यांना पीएच.डी. ही पदवी मिळाली. ‘कविवर्य भा.रा.तांबे यांच्या कवितेचा चिकित्सक अभ्यास’ हा त्यांच्या प्रबंधाचा विषय होता. पुढे १९७९ साली पुस्तकरूपाने तो प्रसिद्ध झाल्यावर साक्षेपी समीक्षक म्हणून त्यांची प्रसिद्धी झाली.

मराठी साहित्यावर ज्यांचा महत्त्वपूर्ण प्रभाव पडलेला आहे, अशा अनेक नामवंत प्रतिभावान साहित्यिकांच्या लेखनाची त्यांनी चिकित्सक समीक्षा केली आहे. त्यांमध्ये कथाकार पु.भा.भावे, कादंबरीकार ना.सी.फडके, कवी ज.के.उपाध्ये इत्यादींचा समावेश असून या संदर्भातील त्यांची ‘पु.भा.भावे: साहित्यवेध’ (१९८९), ‘भारतीय साहित्याचे शिल्पकार: ना.सी.फडके’ (१९९५), ‘मुशाफिरी’ (२०००) ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

त्यांचा काव्याचा व्यासंग आणि अभ्यास मोठा असून ‘मुशाफिरी’ या नावाने मराठी कवितेची समीक्षा करणारा त्यांचा ग्रंथ २००० साली प्रकाशित झाला आहे. जयकृष्ण केशव उपाध्ये हे विदर्भातील एक मान्यवर कवी होत. त्यांची कविता आशाताईंनी अभ्यासपूर्ण प्रस्तावनेसह संपादित केली आहे (१९८५).

त्यांचे कविताविषयक महत्त्वाचे संपादन म्हणजे ‘कविता विदर्भाची’ (१९९१). या ग्रंथात त्यांनी विदर्भातील निवडक कवींच्या वैशिष्ट्यपूर्ण कवितांचे संकलन केले आहे. डॉ.वि.वा.प्रभुदेसाईंच्या सहकार्याने ‘आजचे मराठी साहित्य’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला आहे. त्यांचे अनेक समीक्षात्मक लेख वाङ्मयविषयक विविध नियतकालिकांमधून सातत्याने प्रसिद्ध होत असतात. त्या स्वतः ‘युगवाणी’ या विदर्भ साहित्य संघाच्या मुखपत्राच्या संपादक (१९८६-१९८९) होत्या. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा अंक क्र.२५०मध्ये (जुलै-सप्टेंबर१९८९) त्यांनी ‘कवी यशवंत: एक आकलन’ या लेखातून यशवंतांच्या कवितेचा परामर्श घेतला आहे. जवळपास ३० वर्षे त्यांनी समीक्षक म्हणून मान्यता मिळविली असली तरी ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ (१९७७) ही एक कादंबरी त्यांच्या नावावर आहे. विदर्भातील ख्यातनाम कवींचा परिचय त्यांनी एका लेखमालेतून करून दिला आहे. त्यांची समीक्षा वस्तुस्थितिनिदर्शक, तरीही आस्वादक आहे

टॅग्स :Deathमृत्यू