शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  गाडी जाळली, गाडी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 00:54 IST

शहरातील वाहतूक व्यावसायिक संजू उर्फ संजय बागडी यांनी एका कारची तोडफोड केली तर त्या वाहनांमधील आरोपींनी बागडी यांची कार पेटवून दिली. या दोन्ही घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देदोन गटात जोरदार हाणामारी : प्रतापनगरात अर्ध्या तासात वातावरण गरम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील वाहतूक व्यावसायिक संजू उर्फ संजय बागडी यांनी एका कारची तोडफोड केली तर त्या वाहनांमधील आरोपींनी बागडी यांची कार पेटवून दिली. या दोन्ही घटनांमुळे तणाव निर्माण झाला होता. अशात घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांसोबत बागडींनी वाद घातला. त्यामुळे प्रकरणाला कलाटणी मिळाली. स्रेहनगरमध्ये मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास ही घटना घडली. तत्पूर्वी सुभाषनगरमध्ये युवकांच्या दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या दोन घटनांमुळे प्रतापनगरातील वातावरण मंगळवारी रात्री कमालीचे गरम झाले होते.संजय बागडी यांचे टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्स आहे. गणेशपेठ बसस्थानकाजवळ त्यांचे कार्यालय असून, अंबाझरीत निवासस्थान असल्याचे पोलीस सांगतात. पोलिसांच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास बागडींचा स्रेहनगरमध्ये काही जणांसोबत वाद झाला. त्यातून बागडी यांनी वाद घालणारांच्या कारची तोडफोड केली. परिणामी त्या कारमधील दोघांनी बागडी यांच्या वॅगनआर कारला पेटवून दिले. या घटनेमुळे परिसरात वातावरण गरम झाले. एकाने नियंत्रण कक्षाला तर नियंत्रण कक्षाने प्रतापनगर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार, प्रतापनगर पोलिसांचे पथक तेथे पोहचले. यावेळी तेथे बघ्यांची मोठी गर्दी होती. काय झाले, अशी विचारणा करणा-या पोलिसांसोबत कारमालक बागडी यांनी माहिती देण्याऐवजी वाद घातल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, वाद घालणा-या बागडी यांना निट उभेही राहता येत नव्हते. पोलिसांनी बागडी यांना पोलीस ठाणे आणि नंतर मेडिकलमध्ये नेले. तेथे त्यांची रात्री १२. ३० वाजतार्यंत वैद्यकीय तपासणी सुरू होती.सुभाषनगरात प्रचंड तणावरात्री १०. ३० च्या सुमारास दारूच्या नशेत दोन टोळके एकमेकांसोबत भिडले. त्यांच्यात जोरदार हाणामारी झाल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. मिळालेल्या माहितीवरून प्रतापनगर पोलिसांचे पथक तेथे पोहचले. दोन्ही गटातील हाणामारी करणारांना त्यांनी पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे पोलीस ठाण्यात दोन्ही कडील मंडळी मोठ्या संख्येत पोहचली. त्यांच्यातील काही जण आपसी समेटाची भाषा वापरत होते तर काही जण आरोप-प्रत्यारोप करीत होते. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत पोलीस ठाण्याच्या बाजुचे वातावरण गरम होते. हाणामारी करणारांपैकी काही जण अल्पवयीन होते. त्यामुळे काय कारवाई करावी, यावर विचार सुरू असल्याचे प्रतापनगर पोलीस सांगत होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfireआग