वाहनचोरीचा गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 04:41 PM2024-05-23T16:41:10+5:302024-05-23T16:43:30+5:30

Nagpur : आरोपीला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत

Vehicle Theft arrested by Crime Branch | वाहनचोरीचा गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने लावला छडा

Vehicle Theft arrested by Crime Branch

नागपूर : वाहन चोरी करणाऱ्या आरोपीचा छडा लाऊन गुन्हे शाखेच्या युनिट ५ ने आरोपीने चोरी केलेली दुचाकी जप्त केली आहे.

सोनु खान महबुब खान (रा. यासीन प्लॉट मोठा ताजबाग) असे आरोपीचे नाव असून तो सध्या नागपूर लोहमार्ग पोलिसांनी अटक केल्यामुळे न्यायालयीन कोठडीत आहे. ५ मे २०२४ रोजी सुरेश प्रमोद कुरमनकर (२३, रा. दुर्गानगर पारडी) यांनी आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४०, एस. आर-७६६९ पारडी मेडप्लस ऑफिससमोर उभी करून ठेवली होती.

अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३७९ नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या अधिकारी व अंमलदारांनी मिळालेली माहिती व तांत्रीक तपासानुसार आरोपी सोनु खानचा या गुन्ह्यात समावेश असल्याची खात्री केली. आरोपीने चोरी केलेली दुचाकी मोठा ताजबाग येथील मेला ग्राऊंड येथे बेवारस स्थितीत आढळली. लोहमार्ग पोलिसांनी आरोपी सोनु खानला अटक केली असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत कारागृहात आहे.
 

Web Title: Vehicle Theft arrested by Crime Branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक