शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

फिरते भाजीपाला केंद्र ग्राहकांच्या दारी!

By admin | Updated: July 2, 2014 00:59 IST

शेतकऱ्यांच्या माळ्यावरील ताजी भाजी आता उद्यापासून नागपूरकरांना थेट दारावर उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने मंगळवारी ‘कृषी दिनाचे’ औचित्य साधून पहिल्या फिरत्या भाजीपाला

विभागीय आयुक्तांच्या हस्ते शुभारंभ : नागपुरातील पहिलाच प्रयोगनागपूर : शेतकऱ्यांच्या माळ्यावरील ताजी भाजी आता उद्यापासून नागपूरकरांना थेट दारावर उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाच्यावतीने मंगळवारी ‘कृषी दिनाचे’ औचित्य साधून पहिल्या फिरत्या भाजीपाला केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, कृषी व पणन विभागाचा हा नागपुरातील पहिलाच प्रयोग आहे. नागपूरच्या सभोवताल मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकतो. परंतु तो दलालांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, शिवाय ग्राहकांचीही लूट होते. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी स्वत:चा भाजीपाला स्वत:च ग्राहकांपर्यंत पोहोचवावा, हा यामागील मुख्य उद्देश आहे. यासाठी कृषी व पणन विभाग १३ सुसज्जित व्हॅन तयार करीत असून, त्यापैकी पहिली व्हॅन उद्यापासून ग्राहकांच्या दारी पोहोचणार आहे. यासंबंधी सविस्तर माहिती देताना विभागीय कृषी अधीक्षक आर. बी. चलवदे म्हणाले, ही व्हॅन खास पद्घतीने तयार करण्यात आली आहे. कृषी विभागाने नागपूर विभागात सुमारे ४६८ शेतकरी गट तयार करून, त्यांच्या चार कंपन्या स्थापन केल्या जात आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून भाजीपाला विक्रीचा संपूर्ण व्यवहार चालणार आहे. कृषी व पणन विभागाने यापूर्वी ही योजना मुंबई व पुणे येथे राबविली आहे. तेथील ग्राहकांचा मिळालेला प्रतिसाद लक्षात घेता, आता ती नागपुरात राबविली जात आहे. यात फिरते विक्री केंद्रे व ठिकठिकाणी २८२ किरकोळ भाजीपाला विक्री केंद्रे सुरू करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा व विभागीय कृषी सहसंचालक विजय घावटे प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)