वंजारी यांची वंचितमधून हकालपट्टी ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:07 IST2021-06-24T04:07:38+5:302021-06-24T04:07:38+5:30

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष धनराज वंजारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश ...

Vanjari expelled from deprived () | वंजारी यांची वंचितमधून हकालपट्टी ()

वंजारी यांची वंचितमधून हकालपट्टी ()

नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष धनराज वंजारी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वंचितचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या विभागीय, जिल्हा, तालुका, शहर व महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना यासंदर्भात अधिकृत पत्र जारी केले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, गेल्या ४ जून रोजी थ्री वे मीडिया चॅनलवर तसेच १६ जून रोजी एका वर्तमानपत्रातून वंजारी यांनी ओबीसींचे स्वतंत्र संघटन व नेतृत्व विकसित करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली होती. वंजारी यांनी मांडलेली भूमिका लक्षात घेऊन ओबीसी संघटन बांधणीसाठी ॲड. वंजारींना वंचित बहुजन आघाडीच्या ज्येष्ठ उपाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. पक्षाने ज्या पदाधिकाऱ्यांवर या विषयावर बोलण्याची जबाबदारी दिली आहे तेच या विषयावर बोलतील अन्य कोणीही प्रतिक्रिया देऊ नये, अशी ताकीदही पत्राद्वारे दिली आहे.

Web Title: Vanjari expelled from deprived ()