शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL 2026 Playoffs Race : स्क्रिप्ट भारी की, मॅच? १६ गुण कमावणाऱ्यांसाठीही पोटात गोळा आणणारा ट्विस्ट
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
7
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
8
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
9
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
11
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
12
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
13
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
14
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
15
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
16
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
17
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
18
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
19
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
20
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
Daily Top 2Weekly Top 5

फळे पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर

By admin | Updated: May 26, 2014 01:12 IST

फीट अँड फाईन राहण्यासाठी दैनंदिन आहारात फळांचा वापर करीत असाल तर खबरदार.. हा आहारच तुम्हाला रोगराईच्या दारात लोटू शकतो. कायद्याचा कसलाही धाक उरलेला नसताना नफेखोरीला

पोटाचे आजार, कॅन्सरचा धोका : प्रत्येकानेच सावध राहण्याची गरज

नागपूर : फीट अँड फाईन राहण्यासाठी दैनंदिन आहारात फळांचा वापर करीत असाल तर खबरदार.. हा आहारच तुम्हाला रोगराईच्या दारात लोटू शकतो. कायद्याचा कसलाही धाक उरलेला नसताना नफेखोरीला चटावलेल्या विक्रेत्यांमुळे फळांच्या रूपात बाजारातून दुखणे विकत घेऊन येण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.

फळे पिकविण्यासाठी घातक रसायनांचा वापर करून झटपट नफा कमावण्यासाठी फळाचे ठोक आणि घाऊक विक्रेते ग्राहकांच्या जीवाशी राजरोसपणे हा खेळ करीत आहेत. परिणामी पोटाचे विकार, त्वचा रोग आणि कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांना आमंत्रण मिळत आहे. या घातक रसायनांचा अंश फळांमध्ये उतरत असल्याने ग्राहक पैसे देऊन दुखणे विकत घेत आहेत. फळे पिकविण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने गाईड लाईन ठरवून दिली आहे. मात्र ही गाईड लाईन धाब्यावर बसवत शहरातील शेकडो फळविक्रेते कॅल्शियम कार्बाइड, इकॉन सारखी घातक रसायने वापरून अनैसर्गिकरीत्या फळांना पिकवत आहेत.

नफेखोरीसाठी जीवाशी खेळ

झाडावरून तोडलेले फळ नैसर्गिकरीत्या पिकण्यासाठी दोन ते तीन आठवडे लागतात. मात्र झटपट नफा कमविण्यासाठी फळविक्रेते फळांच्या पेटीत कॅल्शियम कार्बाईडच्या पुड्या ठेवतात. त्यामुळे पेटीची उष्णता वाढून फळ वेळेच्या आधीच पिकते. वास्तविक या रसायनांमुळे फळांमधले नैसर्गिक सत्व कमी होते. शिवाय त्या फळांमध्ये रसायनांचा अंशही उतरतो. त्यामुळे ही फळे आरोग्याला घातक ठरत आहेत. आंबा, चिक्कू, पपई, संत्रे, मोसंबी या सारखी जाड सालपटांची फळे पिकविण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड वापरले जाते तर केळी पिकविण्यासाठी इकॉन नावाचे केमिकल वापरले जाते.

ओळखण्याचे साधनच नाही

बाजारातून विकत घेतलेले फळ नैसर्गिकरीत्या पिकलेले आहे की कृत्रिमरीत्या पकविले आहे, हे शोधण्यासाठी कोणतेही साधन उपलब्ध नाही.प्रयोगशाळेतच त्याचे परीक्षण केले जाऊ शकते. त्यामुळे मुजोर झालेले फळविक्रेते ग्राहकांच्या आयुष्याशी खेळत आहेत.

रसायनयुक्त फळांमुळे

कॅन्सरचा धोका

कॅल्शियम कार्बाइडचा वापर करून पिकविलेली फळे आरोग्यासाठी हानिकारक असतात. अशा फळांच्या सेवनामुळे त्यातील रसायनांचे अंश पोटात जातात. त्यामुळे पोट बिघडणे, मळमळ करणे, अपचन, पोटाची जळजळ, जुलाब, डोकेदुखी, उलट्या सारख्या तक्रारी वाढतात. फळांमधील कार्बाइडच्या अंशामुळे शरीरात इथिलीन नावाचा गॅस तयार होतो. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढत चालला आहे.

फळांमधूनही विषबाधा होऊ शकते

नैसर्गिकरीत्या पिकलेले कोणतेही फळ आरोग्यासाठी गुणकारी असते. मात्र कार्बाइडच्या माध्यमातून पिकविलेल्या फळांत रसायनांच्या अंशामुळे विषबाधा होऊ शकते. रोगाशी प्रतिकार करण्याची क्षमता वाढविण्यासाठी फळांचा आहार प्रत्येकानेच घेतला पाहिजे. पोटाच्या माध्यमातून आपल्याला ही शक्ती मिळत असते. मात्र रसायनयुक्त फळांमुळे ही शक्तीच कमी होत आहे.

आरोग्यावर परिणाम

आंब्याचा सिझन असताना अनेक वेळा बाजारात गेल्यानंतर प्रत्येकालाच विकत घेण्याची इच्छा होते. समोरचे फळ कशा रीतीने पिकविले आहे, हे सामान्यांना कसे कळणार. अशा रासायनिक फळांमुळे आरोग्यावर परिणाम होण्याचा धोका वाढत आहे. प्रशासनाने त्याला आवर घालणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)