शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
4
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
5
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
6
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
7
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
8
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
9
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
10
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
11
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
12
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
13
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
14
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
15
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
16
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
17
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
18
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
19
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
20
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत दफ्तरांचे अद्ययावतीकरण करणार

By admin | Updated: July 23, 2014 00:51 IST

पंचायत राज व्यवस्थेतील पहिली पायरी असलेल्या ग्रामपंचायतींचे दफ्तर अद्ययावत राहत नसल्याने ग्रामपंचायतस्तरावरून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. विकास निधीतही अपहार

यवतमाळ : पंचायत राज व्यवस्थेतील पहिली पायरी असलेल्या ग्रामपंचायतींचे दफ्तर अद्ययावत राहत नसल्याने ग्रामपंचायतस्तरावरून अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. विकास निधीतही अपहार झाल्याची प्रकरणे पुढे येत आहेत. यावर नियंत्रणासाठी ग्रामविकास विभागाने दफ्तर अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ग्रामपंचायतीमध्ये अंतर्गत होणाऱ्या सभा, कार्यवृत्त, रोख पुस्तिका न लिहणे, मोजमाप पुस्तिका अपूर्ण असणे, झालेल्या खर्चाचा हिशेब ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत ठेवण्यात येत नाही. अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आणि त्यांची चौकशी करण्याचे काम जिल्हा परिषद पंचायत विभागाला करावे लागत आहे. दफ्तर अद्ययावत नसल्याने अपहाराची प्रकरणे बाहेर येत नाही. विकासाच्या योजनांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी चौकशीत गुंतून पडावे लागत आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी सुरू केल्यास त्याचे दस्तऐवज नसल्याचे आढळून येते. हा प्रकार सातत्याने घडत असल्याने दफ्तर अद्ययावत करण्यावर विशेष भर दिला जात आहे. ग्रामविकास विभागाने ग्रामपंचायतींच्या मुल्यमापनासाठी ३९ मुद्यांची टिप्पणी तयार केली आहे. त्यासाठी निश्चित कालावधी ठरवून दिला आहे. दोन हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीला ३१ जुलैची मुदत असून पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना १५ आॅगस्ट आणि पाच हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ३१ आॅगस्टची मुदत देण्यात आली आहे. सर्व ग्रामपंचायतींना ही टिप्पणी देण्यात आली आहे. यानुसार माहिती भरल्यास ग्रामपंचायतीच्या कामकाजाची संपूर्ण माहिती त्वरित मिळणार आहे. विशेषत: ग्रामपंचायत दफ्तराची स्थिती काय आहे, हे सहज स्पष्ट होणार आहे. अपूर्ण कागदपत्रांमुळे भविष्यात होणारी कारवाई टाळण्याची संधी ग्रामविकास विभागाने उपलब्ध करून दिली आहे. शिवाय ग्रामपंचायत पातळीवर होणाऱ्या भष्ट्रचाराला यातून आळा बसणार आहे. (प्रतिनिधी)