बहादुरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी पुष्पा गायधने यांची अविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:11+5:302021-02-13T04:09:11+5:30
बुटीबोरी : बहादुरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपासमर्थीत पॅनेलच्या पुष्पा रवींद्र गायधने, तर उपसरपंचपदी मोहम्मद अयाज हारुण घाणीवाला यांची अविरोध निवड ...

बहादुरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी पुष्पा गायधने यांची अविरोध निवड
बुटीबोरी : बहादुरा ग्रा.पं.च्या सरपंचपदी भाजपासमर्थीत पॅनेलच्या पुष्पा रवींद्र गायधने, तर उपसरपंचपदी मोहम्मद अयाज हारुण घाणीवाला यांची अविरोध निवड झाली.
१७ सदस्यीय असलेल्या या ग्रा.पं.मध्ये भाजपासमर्थीत गटाचे १५ सदस्य विजयी झाले आहेत. त्यामुळे येथे भाजपकडे बहुमत असल्याने सरपंचपदासाठी चुरस नव्हती. या ग्रा.पं.मध्ये भाजपासमर्थीत पॅनेलच्या पुष्पा रवींद्र गायधने, राधिका ढोमणे, वनीता उरकुडकर, माधुरी कांबळे, सुधा सेलोकर, ज्योती बोकडे, सीमा चापेकर, किरण नांदुरकर, वंदना नगराळे या नऊ महिला सदस्या विजयी झाल्या आहेत. पुरुष सदस्यांमध्ये बाबा कुंभरे, बालू घोडमारे, विनोद परीहार, विशाल सिमले, नितीन शेळके, मोहम्मद अयाज हारुण घाणीवाला विजयी झाले आहेत. येथे काँग्रेससमर्थीत पॅनेलचे पिंटू मांडवकर व विनोद शिंदे विजयी झाले आहेत. नवविर्वाचित सरपंच आणि सदस्यांचे भाजपाचे प्रदेश महामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अभिनंदन केले.