शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

विद्यापीठाचे आदेश : विद्यार्थ्यांकडून टप्प्याटप्प्याने घ्या शुल्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 22:57 IST

विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीची सक्ती करू नये, प्रवेश देताना एकाच वेळी पूर्ण शुल्क घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने (हप्ते पाडून) शुल्क घ्यावे, असे आदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी जारी केले आहे.

ठळक मुद्देमहाविद्यालयांच्या अडचणीत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विद्यार्थ्यांकडून शुल्क वसुलीची सक्ती करू नये, प्रवेश देताना एकाच वेळी पूर्ण शुल्क घेण्याऐवजी टप्प्याटप्प्याने (हप्ते पाडून) शुल्क घ्यावे, असे आदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे वित्त व लेखा अधिकारी डॉ. राजू हिवसे यांनी जारी केले आहे. यात विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाचा हवाला देण्यात आला आहे.या आदेशामुळे महाविद्यालयांचे प्राचार्य व संस्थेचे संचालक विद्यापीठाविरुद्ध मोर्चा उघडण्याच्या तयारीत आहेत. विशेषत: पारंपरिक अभ्यासक्रम संचालित करणारी महाविद्यालये. कारण विद्यापीठात पारंपरिक अभ्यासक्रमांचे शुल्क कमी आहे. खासगी विना अनुदानित महाविद्यालयाला राज्य सरकारकडून कुठलेही अनुदान मिळत नाही. महाविद्यालयाचे संचालन पूर्णपणे विद्यार्थ्यांकडून मिळणाऱ्या शुल्कावर अवलंवून असते. अशा परिस्थितीत किस्तनुसार शुल्क वसुलीच्या आदेशामुळे महाविद्यालय चालविताना अडचणीचा सामना करावा लागेल.विद्यापीठाच्या आदेशावर महाविद्यालय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, महाविद्यालयांना राज्य सरकारकडून स्कॉलरशिपची रक्कम नियमितपणे मिळत नाही. मोठ्या मुश्किलीने महाविद्यालयाचे संचालन होते. विद्यापीठाकडून अनेक प्रकारचे मापदंड महाविद्यालयांसाठी निश्चित केले जाते. त्याचे पालन तेव्हाच होऊ शकेल जेव्हा ते आर्थिकदृष्ट्या सक्षम राहील. या आदेशानंतर अनेक विद्यार्थी पूर्ण शुल्क देण्याऐवजी टप्प्याटप्प्याने शुल्क भरण्यावर अडले आहेत. अनेक अभ्यासक्रम असे आहेत ज्याचे शुल्क अधिक असते. त्या अभ्यासक्रमात प्रवेश घेणाºया विद्यार्थ्यांना तीन ते चार किस्तमध्ये शुल्क भरण्यास सांगितले जाते. विद्यापीठाच्या या आदेशानंतर शुल्क वसूल करण्यात अनेक अडचणी येतील.आदेश परत घ्यावेएका महाविद्यालयाच्या संस्था संचालकाने म्हटले आहे की, हे आदेश जारी करण्याचा कुठलाही अर्थ नाही. पारंपरिक अभ्यासक्रम संचालित करणाºया महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची तशीही कमतरता आहे. ती दूर करण्यासाठी कॉलेज स्वत: अनेक विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करीत असतात. त्याची भरपाई प्रोफेशनल अभ्यासक्रमाच्या शुल्कातून केली जाते. विद्यापीठाच्या आदेशामुळे महाविद्यालय आता तसे करू शकणार नाही. त्यामुळे विद्यापीठाने हे आदेश मागे घ्यायला हवे. 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठStudentविद्यार्थी