शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणारा जगावेगळा शिक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 21:05 IST

तो मनाने तसा खेळाडू आहे. म्हटले तर विद्यार्थी आणि कर्माने माणुसकीची भावना जपणारा पालक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृत्तीने शिक्षकदेखील आहे. कुठलीही शास्त्रोक्त पदवी नाही, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गंध नाही. मात्र जिद्द, परिश्रम आणि ‘व्हिजन’ हीच त्याची शक्ती. याच त्रिसूत्रीतून त्याने अगदी तळागाळातून विद्यार्थी शोधले असून त्यांना शिक्षण अन् खेळाचे संस्कार देण्यासाठी झटतो आहे. मार्ग कठीण आहे, समस्या अनंत आहेत, पण हृदयात वसलेली शिक्षकाची प्रामाणिक भावना संघर्षाला बळ देत आहे. यातूनच एक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अशा तिन्ही बाजू सांभाळण्याची कसरत सुरू आहे. ही कहाणी आहे भंडारा जिल्ह्यातील व नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागातील विद्यार्थी जयंत तांडेकर यांची.

ठळक मुद्देक्रीडाप्रकारांचे स्वखर्चाने प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तो मनाने तसा खेळाडू आहे. म्हटले तर विद्यार्थी आणि कर्माने माणुसकीची भावना जपणारा पालक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वृत्तीने शिक्षकदेखील आहे. कुठलीही शास्त्रोक्त पदवी नाही, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गंध नाही. मात्र जिद्द, परिश्रम आणि ‘व्हिजन’ हीच त्याची शक्ती. याच त्रिसूत्रीतून त्याने अगदी तळागाळातून विद्यार्थी शोधले असून त्यांना शिक्षण अन् खेळाचे संस्कार देण्यासाठी झटतो आहे. मार्ग कठीण आहे, समस्या अनंत आहेत, पण हृदयात वसलेली शिक्षकाची प्रामाणिक भावना संघर्षाला बळ देत आहे. यातूनच एक शिक्षक, विद्यार्थी आणि पालक अशा तिन्ही बाजू सांभाळण्याची कसरत सुरू आहे. ही कहाणी आहे भंडारा जिल्ह्यातील व नागपूर विद्यापीठातील जनसंवाद विभागातील विद्यार्थी जयंत तांडेकर यांची.मूळ भंडारा जिल्ह्यातील सासरा या लहानशा गावातील असलेल्या जयंतला लहानपणापासूनच क्रीडाप्रकारांची आवड होती. योग्य प्रशिक्षणाअभावी ‘अ‍ॅथ्लेटिक्स’मधील त्याच्या अनेक चांगल्या संधी हुकल्या. नागपूर विद्यापीठातून मराठीत पदव्युत्तर शिक्षण घेत असताना क्रीडास्पर्धांत त्याने चमकदेखील दाखविली. मात्र नेमकी गुडघ्याला दुखापत झाली अन् राज्यपातळीवर जाण्याचे त्याचे स्वप्न अपूर्ण राहिले.मात्र त्याने हार मानली नाही अन् आपण दुसऱ्यांना घडवू शकतो हा विश्वास पक्का होत गेला. सुरुवातीला पोलीस प्रशिक्षण अकॅडमीमध्ये त्याने क्रीडाप्रकार शिकविण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने जवळच्या लोकांकडून अक्षरश: पैसे उधार घेतले व लहान गावातील मुलांना एकत्रित आणून त्यांना क्रीडा प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये तर त्याने १६ जण आपल्या घरी आणले व त्यांना ‘अ‍ॅथ्लेटिक्स’चे प्राथमिक प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. यातील तीन मुलांमधील ‘टॅलेन्ट’ त्याने हेरले व त्यांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यासाठी धडपड सुरू केली. या मुलांचे पालक व शाळेकडून यासाठी विरोध झाला. मात्र मोठ्या प्रयत्नांनी त्याने त्यांचे मन वळविले अन् एका नव्या प्रवासाला सुरुवात झाली.मुलांच्या शिक्षणाचीदेखील केली सोयमुलांना ‘अ‍ॅथ्लेटिक्स’चे प्रशिक्षण देत असताना मुलांच्या शिक्षणाचीदेखील सोय व्हावी म्हणूनदेखील जयंतने प्रयत्न सुरू केले. शहरातील एका अनाथालयातील रिकामी पडलेली जागा त्याला राहण्यासाठी मिळाली. तिघांचा त्याने शाळेतदेखील प्रवेश करवून दिला. तसेच जयंतने स्वत:देखील जनसंवाद विभागात प्रवेश घेतला. स्वत:चा, विद्यार्थ्यांचा अभ्यास सांभाळून तो त्यांना नियमितपणे क्रीडाप्रकारांचे प्रशिक्षण देत आहे. विशेष म्हणजे यातील एका ११ वर्षीय विद्यार्थ्याने पुण्यातील राज्यस्तरीय अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत पहिला क्रमांकदेखील पटकाविला.

 

टॅग्स :Teacherशिक्षकnagpurनागपूर