काटे प्रत्येकाच्याच पायाखाली, ते सहन करा अथवा दूर करा : सिंधूताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 01:13 AM2019-11-28T01:13:14+5:302019-11-28T01:14:57+5:30

संकटांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. प्रत्येकाच्याच पायाखाली काटे आहेत आणि ते रुतणारही आहेतच. ते सहन करण्याची क्षमता निर्माण करावी लागेल आणि बाजूला सारून मार्ग काढावा लागणार असल्याचे प्रबोधन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सिंधूताई सपकाळ यांनी केले.

Under the thorns of everyone, bear it or remove it: Sindhutai Sapakal | काटे प्रत्येकाच्याच पायाखाली, ते सहन करा अथवा दूर करा : सिंधूताई सपकाळ

काटे प्रत्येकाच्याच पायाखाली, ते सहन करा अथवा दूर करा : सिंधूताई सपकाळ

Next
ठळक मुद्देअशिक्षिताला कमी लेखू नका‘मी माईची वेडी’ पुस्तकाचे मुखपृष्ठ व ‘आठवणीतील शाळा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संकटांचा सामना प्रत्येकालाच करावा लागतो. प्रत्येकाच्याच पायाखाली काटे आहेत आणि ते रुतणारही आहेतच. ते सहन करण्याची क्षमता निर्माण करावी लागेल आणि बाजूला सारून मार्ग काढावा लागणार असल्याचे प्रबोधन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. सिंधूताई सपकाळ यांनी केले.
माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान, सेवाव्रत बहुउद्देशीय संस्था व महर्षी मार्कंडेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘मी माईची वेडी’ पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे व ‘आठवणीतील शाळा’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी ‘माई महाराष्ट्र राज्य साहित्य प्रतिष्ठान’चा शुभारंभ सिंधूताई सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. व्यासपीठावर माध्यम प्रतिष्ठानच्या सविता मोहन मते, विश्वास महादुले, ग्रामगीताचार्य अनिल पिट्टलवार, ज्येष्ठ पत्रकार सुनील कुहीकर उपस्थित होते.
डोळे उघडून आयुष्याकडे बघण्याची वृत्ती प्रत्येकाने जोपासावी. जे चांगले त्याचा स्वीकार करता यायला हवा. प्रत्येकातच चांगल्या-वाईट प्रवृत्ती आहेत. मात्र, चांगलेपणा प्रबळ करावा. शिक्षित व्यक्ती सर्वकाही करू शकतो, हा भ्रम आहे. अशिक्षितही जे शिक्षिताला जमणार नाही, ते साध्य करण्याची क्षमता ठेवतो. आयुष्य हे बोधप्रद आहे आणि त्यातूनच शिकता येते. पत्नींनी पतीला जगण्याचे बळ द्यावे, मादी वाटेल असे नव्हे तर माय वाटेल असे कपडे घालावे, तू उद्याची माऊली आहे, असा सल्ला सिंधूताई सपकाळ यांनी यावेळी दिला. प्रास्ताविक सीमा राऊत-पाटील यांनी केले. याप्रसंगी डॉ. अशोक पवनीकर, नीना निनावे, भाऊराव कोसे, माधुरी पांडे, डी.बी. महाजन यांचा सत्कार करण्यात आला. स्वागतगीत प्रा. मीना उपाध्ये यांनी सादर केले. संचालन विजय जथे यांनी केले. याप्रसंगी स्वागताध्यक्ष मोनिका रणजित राठोड उपस्थित होत्या.
त्यानंतर पार पडलेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी आचार्य ना.गो. थुटे होते. तर मृणालिनी वाघमारे, किशोर पौनीकर, डॉ. मनोज सोनुने व अशोक वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सत्राचे संचालन जागृती आठवले यांनी केले. यावेळी राहुल जवादे, श्याम दलाल, आनंद चुरड, तुषार फडणवीस, डॉ. प्रवीण पाटील, चंद्रशेखर तुमसरे, अरुण दोनाडकर, मारुती गुंडेवार, गुलाब राऊतपाटील, उज्ज्वला राऊतपाटील, रेखा शेळके, गणेश तर्वेकर, गीता पालपनकर, रूपेश आठवले, पंचवटी गोंडाळे, उषा नळगीरे, गंगाधर राठोड, राजेंद्र सगर, आनंद मुदखेड, सदानंद गुंडेवार, प्रवीण भाकरे उपस्थित होते.

७२ दिव्यांचे औंक्षण
सिंधूताई सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त याप्रसंगी त्यांना सुवासिनींनी ७२ दिव्यांनी ओवाळून औंक्षण केले. हा अनुपम सुरेख असा सोहळा बघण्याचा आनंद रसिकांना लाभला.

Web Title: Under the thorns of everyone, bear it or remove it: Sindhutai Sapakal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर