शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
3
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
4
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
5
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
6
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
7
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
8
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
9
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
10
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
11
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
12
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
13
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
15
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
16
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
17
NEET पेपरफुटी प्रकरणात CBI ची मोठी कारवाई; मुख्य सूत्रधाराला अटक, पेपर कसा फुटला?
18
‘काही बेरोजगार हे झुरळासारखे, ते पुढे आरटीआय कार्यकर्ते बनतात’, सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी याचिकाकर्त्याला  सुनावले
19
न्यायालयावर निर्णय लांबविण्याचा आरोप करणे थांबवा; कोर्टाचा उद्धवसेनेला इशारा
20
आर्थिक संकट, सोन्याची दरवाढ, अन्...; बाबा वेंगाने २०२६ बाबत वर्तवली होती काळजीत टाकणारी भाकितं! खरी ठरणार? 
Daily Top 2Weekly Top 5

...अन नागपूरकरांनी व्यक्त केली हळहळ

By admin | Updated: May 24, 2014 01:16 IST

ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांच्या कार्यक्रमाच्या आठवणी अजून ताज्या आहेत. कार्यक्रम संपला असला तरी त्यांचे स्वर आणि स्वरसाज रसिक विसरले नाहीत. विसरू शकत नाहीत. संगीतातून आनंद शोधणारा

संगीतकार आनंद मोडक यांचे आवडते शहर नागपूर

नागपूर : ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक यांच्या कार्यक्रमाच्या आठवणी अजून ताज्या आहेत. कार्यक्रम संपला असला तरी त्यांचे स्वर आणि स्वरसाज रसिक विसरले नाहीत. विसरू शकत नाहीत. संगीतातून आनंद शोधणारा आणि रसिकांना आनंद देणार्‍या आनंद मोडक यांचे पुणे येथे आज निधन झाले. ७ मे २०१२ साली त्यांचा एकमेव कार्यक्रम नागपुरातील सायंटिफिक सभागृहात आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम सप्तकने आयोजित केला होता. त्यावेळी त्यांच्या गीतसंगीतावर प्रेम करणार्‍या चाहत्यांनी प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी गर्दी केली. त्यांच्या निधनाची बातमी कळताच नागपूरकर रसिक हळहळले. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर स्वत:चे नाव स्वत:च्या स्वतंत्र शैलीने अंकित करणारा एक महान संगीतकार गमाविल्याची खंत नागपूरकरांनी व्यक्त केली. आनंद मोडक यांनी अनवट सुरावटींना हात घातला. ते मूळ विदर्भाचे म्हणजे अकोल्याचे होते. त्यामुळेच विदर्भातील रसिकांनी त्यांच्यावर भरभरून प्रेम केले. अकोल्यात त्यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर नागपुरातल्या कार्यक्रमासाठी ते उत्सुक असायचे. त्यांना हे शहर आणि येथील रसिक, त्यांचे संगीतवारचे प्रेम माहीत होते. अनवट आणि भावपूर्णता हा त्यांच्या संगीताचा गाभा होता. अकोल्यावरून पुण्यात गेल्यावर त्यांच्या घराशेजारी राहणार्‍या अभिनेते मोहन गोखले यांनी त्यांना थिएटरमध्ये आणले आणि त्यांच्या आयुष्याची दिशा बदलली. त्यानंतर घाशीराम कोतवाल या नाटकाला संगीत देताना त्यांनी यात भूमिकाही केली. चौकट राजा, एक होता विदूषक, हरिश्चंद्राची फॅक्टरी, समांतर, नातीगोती, तू तिथे मी आदी चित्रपटांना त्यांनी दिलेले संगीत लोकप्रिय झाले. त्यांचा कार्यक्रम चांगलाच रंगला. अजेय गंपावार यांनी त्यांची मुलाखत घेतली होती. (प्रतिनिधी)