शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

बोरीच्या विनोदची यूपीएससीत भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2016 02:38 IST

ेजिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, सर्वसामान्य शाळेत दहावीपर्यंतचे तर पदवी शिक्षणासाठी कन्हानला रोज सायकलने १०

गणेश खवसे ल्ल नागपूरेजिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, सर्वसामान्य शाळेत दहावीपर्यंतचे तर पदवी शिक्षणासाठी कन्हानला रोज सायकलने १० किमीचा प्रवास आणि एक जिद्द मनात ठेवून मार्गक्रमण करणाऱ्या विनोदकुमार चंद्रभान येरणे यांनी छोट्याशा गावाचे नाव उंचावले. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत ७०९ वा रँक मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.मौदा तालुक्यातील बोरी (सिंगोरी) या छोट्याशा गावात परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या येरणे कुटुंबात ८ आॅगस्ट १९८२ रोजी जन्मलेल्या विनोदकुमार यांची संघर्षकथा तशी थरारकच म्हणावी लागेल. घरी केवळ चार एकर शेती. त्यातच गेल्या १२ वर्षांपूर्वी विनोदकुमार यांच्या वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबावर दु:खाचा पहाड कोसळला. परंतु त्यातून आई शकुंतलाबाई आणि मोठा भाऊ प्रदीप यांनी कुटुंबाला सावरले. त्यामुळेच पुढील शिक्षणात कुठेही व्यत्यय आला नाही. बोरी गावातीलच जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण, त्यानंतर तारसा येथील हायस्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण झाले. पुढे ११-१२ वी सालवा येथील कनिष्ठ महाविद्यालयातून झाले. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी त्यांचा खरा संघर्ष सुरू झाला. पदवी शिक्षण घ्यायचे असल्यास तालुक्याचे ठिकाण मौदा किंवा कन्हान असा पर्याय त्यांच्याकडे होता. मौदा ये-जा करणे परवडण्यासारखे नसल्याने त्यांनी कन्हान निवडले. पार्टटाईम व्हिडिओ शुटिंगही केले४संघर्षाचे दिवस पाहिलेल्या विनोदकुमार यांच्या यशामुळे अख्खे बोरी (सिंगोरी) गाव आनंदी झाले आहे. ‘मेहनत रंग लायी’ असे त्यांचा लहान भाऊ नरेश यांचे म्हणणे आहे. कोणताही खंड पडू न देता त्यांनी शिक्षण सुरू ठेवले. दरम्यान त्यांनी आपल्या भावाला आर्थिक हातभार लावावा म्हणून भाऊ करीत असलेल्या ‘व्हिडिओ शुटिंग’साठी कॅमेरासुद्धा हातात घेतला. मग कुठे लग्न असो वा कुठे वाढदिवस... तेथे जाऊन शुटिंग करण्यासही विनोदकुमार यांनी मागेपुढे बघितले नाही.