दुचाकीचोर हनीला गुन्हे शाखेने केले गजाआड
By दयानंद पाईकराव | Updated: March 24, 2024 14:58 IST2024-03-24T14:58:08+5:302024-03-24T14:58:22+5:30
गेल्या २० मार्चला दुपारी २.३० वाजता अनिकेत महेंद्र चव्हारे (२५, रा. विश्रामनगर, कपिलनगर) यांनी आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, बी. ए-५३६८ किंमत ५० हजार आपल्या घराच्या कंपाऊंडजवळ लॉक करून उभी केली होती. अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी पळविली. या प्रकरणी त्यांनी कपिलनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

दुचाकीचोर हनीला गुन्हे शाखेने केले गजाआड
नागपूर : दुचाकीचोराला गुन्हे शाखेच्या यु निट ४ ने अटक करून त्याच्या ताब्यातून ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त केली आहे. निशाद उर्फ हनी सुकेश पाली (१९, रा. एनआयटी गार्डनजवळ कपिलनगर) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकीचोराचे नाव आहे.
गेल्या २० मार्चला दुपारी २.३० वाजता अनिकेत महेंद्र चव्हारे (२५, रा. विश्रामनगर, कपिलनगर) यांनी आपली दुचाकी क्रमांक एम. एच. ४९, बी. ए-५३६८ किंमत ५० हजार आपल्या घराच्या कंपाऊंडजवळ लॉक करून उभी केली होती. अज्ञात आरोपीने त्यांची दुचाकी पळविली. या प्रकरणी त्यांनी कपिलनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या युनिट ४ चे अधिकारी व अंमलदार यांनी गोपनिय माहिती व तांत्रीक तपास करून आरोपी हनीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून चोरी केलेली दुचाकी जप्त करून आरोपीला कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.