नागपुरात ट्रेलरच्या धडकेत दुचाकीचालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 21:07 IST2019-02-01T21:06:24+5:302019-02-01T21:07:30+5:30
भरधाव ट्रेलरचालकाने धडक मारल्यामुळे एका दुचाकीचालकाचा करुण अंत झाला. मानेवाडा ते म्हाळगीनगर चौकादरम्यान गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला.

नागपुरात ट्रेलरच्या धडकेत दुचाकीचालक ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भरधाव ट्रेलरचालकाने धडक मारल्यामुळे एका दुचाकीचालकाचा करुण अंत झाला. मानेवाडा ते म्हाळगीनगर चौकादरम्यान गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. त्रिणय रवींद्र सुमीते (वय ३२) असे मृताचे नाव असून तो बेलतरोडी जवळच्या गोटाड पांजरी येथील रहिवासी होता.
सुमीते त्याच्या कार्यालयात लागणारे पडदे विकत घेण्यासाठी दुचाकीने जात होता. मानेवाडा चौक ते म्हाळगीनगर चौकादरम्यान ग्रीनबारजवळ भरधाव ट्रेलरचालकाने सुमीतेच्या दुचाकीला जोरदार धडक मारली. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला मेडिकलमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी देवेंद्र मारोतराव मोहाडीकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपी ट्रेलरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी ट्रेलरचालकाचा शोध घेतला जात आहे.