नागपुरात दुचाकी चालक अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 21:04 IST2020-06-15T21:01:54+5:302020-06-15T21:04:18+5:30
निष्काळजीपणे दुचाकी चालविणे एका तरुणासाठी आत्मघाती ठरले. अनियंत्रित दुचाकी ब्रेकरवरून उसळून तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

नागपुरात दुचाकी चालक अपघातात ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निष्काळजीपणे दुचाकी चालविणे एका तरुणासाठी आत्मघाती ठरले. अनियंत्रित दुचाकी ब्रेकरवरून उसळून तो खाली पडल्याने त्याचा मृत्यू झाला. स्वप्निल ऊर्फ अतुल कृष्ण पाठक (वय २३) असे मृत तरुणाचे नाव असून तो काँग्रेस नगरात होमगार्ड ऑफिसजवळ राहत होता. रविवारी रात्री ११.२५ च्या सुमारास अतुल त्याच्या दुचाकीने सुसाट वेगाने घराकडे येत होता. रहाटे कॉलनी मेट्रो स्टेशन जवळ स्पीड ब्रेकरवरून अतुलची गाडी उसळला. तो खाली पडला आणि त्याला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरकडे नेले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी फिर्यादी गौरव हिरालाल कासार यांनी दिलेल्या तक्रारीवरून धंतोली पोलिसांनी अपघाताची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.