शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

दोन विद्यार्थिनींची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 01:24 IST

शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देवर्गाला बुट्टी मारून फिरायला गेल्या : वडिलांना कळाल्यामुळे जीव दिला

लोकमत न्यूज नेटवर्ककोराडी/नागपूर : शुक्रवारी दुपारपासून बेपत्ता झालेल्या दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनींचे मृतदेह तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. मनीषा ईश्वर पटले (वय १७) आणि आशना रवींद्र रोकडे (वय १७), अशी मृत मुलींची नावे आहेत. त्यांनी दडपणात येऊन आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.मनीषा आणि आशना या दोघीही जरीपटक्यातील लहानुजीनगरात राहत होत्या. त्या दयानंद महाविद्यालयात १२ वीत शिकायच्या. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या महाविद्यालयात जात आहोत, असे सांगून घरून निघाल्या. मात्र, सायंकाळ झाली तरी त्या परतल्या नाही. त्यामुळे पालकांनी शोधाशोध सुरू केली. ओळखीचे, नातेवाईक, मित्रमंडळी अशा सर्वांकडे विचारपूस करण्यात आली. त्या महाविद्यालयात आणि शिकवणी वर्गातही गेल्या नव्हत्या. दिवसभर त्या निशिकांत घनश्याम नागपुरे नामक मित्रासोबत दुचाकीने फिरत होत्या. असे त्यांच्या पालकांना कळले. मैत्रिणीने ही गोष्ट या दोघींना मोबाईलवर संपर्क करून कळविली. त्यामुळे त्या दडपणात आल्या. आपली आता घरी गेल्यानंतर खरडपट्टी काढली जाईल, या भीतीने त्या अस्वस्थ झाल्या. यावेळी त्या कोराडीच्या मालगुजारी तलावाजवळ होत्या. त्यांनी निशिकांतला हा प्रकार सांगून आत्महत्या करण्याचा विचारही बोलून दाखवला. हादरलेल्या निशिकांतने त्यांची कशीबशी समजूत काढली. एवढेच नव्हे तर मनीषाच्या वडिलांना फोन करून या दोघी आत्महत्या करण्याच्या विचारात असल्याचेही कळविले. वडिलांनी त्याला त्यांची समजूत काढण्यास सांगितले. घाबरू नका, आम्ही तिकडे येतो, असे म्हटले. दरम्यान, फोन करून निशिकांतने मागे वळून बघितले तेव्हा त्याला मनीषा आणि आशना दिसल्या नाही. त्याने पुन्हा मनीषाच्या वडिलांना फोन केला. नियंत्रण कक्षातही कळविले. मनीषाचे वडील पोहोचल्यानंतरकुणावर होणार कारवाई ?महाराजबाग, विविध तलाव, गार्डनमध्ये आणि शहराबाहेरच्या मार्गावर शाळकरी-महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनी झाडाच्या आडोशाला बसलेले दिसतात. मनीषा-आशनाचाही असाच प्रकार आहे. पोलिसांना एक चिठ्ठी सापडली. त्यात नेमके काय लिहून आहे, ते कळायला मार्ग नाही. या प्रकरणात कोणती अन् कुणावर कारवाई करावी, असा विचार पोलीस करीत आहेत.