शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर जिल्ह्यातील कुही - वडोदा मार्गावर टिप्परच्या धडकेने दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:44 IST

भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांचा कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुही - वडोदा मार्गावरील नान्हा मांगली (ता. कामठी) शिवारात शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे कुही शहरात तीव्र पडसाद उमटले.

ठळक मुद्देदुचाकीला उडविले : नान्हा मांगली शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारांचा कुही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुही - वडोदा मार्गावरील नान्हा मांगली (ता. कामठी) शिवारात शनिवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेचे कुही शहरात तीव्र पडसाद उमटले.देवेंद्र ऊर्फ चिकू लक्ष्मीकांत भगत (३४) व सूरज रमेश मांढरे (२४) दोघेही रा. कुही अशी मृतांची नावे आहेत. दोघेही मौदा येथील एनटीपीसीच्या वीज प्रकल्पात नोकरीला असल्याने ते शनिवारी सकाळी एमएच-३१/बीई-३८३५ क्रमांकाच्या मोटरसायकलने नेहमीप्रमाणे कुही - वडोदा (ता. कामठी) मार्गे मौद्याला कामावर जात होते. या मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने तसेच कंत्राटदारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ तयार झाली आहे. कारण रस्त्याच्या कामात मोठ्या प्रमाणात मातीमिश्रित मुरमाचा वापर केला जात आहे. दोघेही नान्हा मांगली शिवारात पोहोचताच भरधाव टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. त्यात दोघेही गंभीर जखमी झाले.अपघात होताच दोघांनाही लगेच कुही येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती देवेंद्रला मृत घोषित केले तर सूरजवर उपचार सुरू केले. मात्र, काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. दोघेही आपापल्या घरातील कर्ते पुरुष असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर या अपघातामुळे मोठा आघात झाला. या प्रकरणी कुही पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून प्रकरण पुढील तपासासाठी मौदा पोलिसांकडे वर्ग केले.तहसील कार्यालयावर मोर्चाया घटनेचे पडसाद म्हणून सर्वपक्षीय नेत्यांनी शनिवारी दुपारी कुही तहसील कार्यालयावर मोर्चा नेला. यावेळी नागरिकांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपये नुकसानभरपाई देण्याची मागणी रेटून धरली. त्यामुळे तहसीलदार विनिता लांजेवार यांनी कंत्राटदार कंपनीचे अधिकारी के. जी. सिंग यांना तहसील कार्यालयात बोलावले. शिवाय, अपघाताला जबाबदार ठरलेला टिप्पर जप्त करून मौदा पोलिसांच्या स्वाधीन केला. यावेळी प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे तसेच ही रक्कम आरटीजीएसद्वारे बँक खात्यात जमा करण्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मान्य केल्याने नागरिक शांत झाले. चर्चेत तहसीलदार लांजेवार, ठाणेदार प्रकाश हाके, ईश्वर धनजोडे, आशिष आवळे, प्रशांत दशमवार, हरीष कढव व नागरिक सहभागी झाले होते.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू