शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

आगीत दोन घरे खाक

By admin | Updated: May 1, 2016 03:08 IST

भरदुपारी दोन घरांना आग लागल्याने संपूर्ण घरगुती साहित्य भस्मसात झाले. या आगीच्या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीयांचे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले.

साहित्यांची राखरांगोळी : काटोल शहरातील घटनाकाटोल : भरदुपारी दोन घरांना आग लागल्याने संपूर्ण घरगुती साहित्य भस्मसात झाले. या आगीच्या घटनेमुळे दोन्ही कुटुंबीयांचे जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले. आग लवकर नियंत्रणात आल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना काटोल शहरातील हनुमाननगर येथे दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. शहरातील हनुमाननगर येथील रामदास खडसे यांच्या घराला अचानक आग लागली. घटनेदरम्यान खडसे दाम्पत्य कामानिमित्त बाहेर गेले होते. परंतु त्यांची ६,४ व २ वर्षांची तीन मुले घरात होती. दरम्यान, लाडगावहून घरी परत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सरिता मडके यांना खडसे यांच्या घराला आग लागल्याचे दिसले. लागलीच त्यांनी प्रसंगावधान राखत घरात अडकलेल्या तीन मुलांना घराबाहेर काढले.काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोळ शेजारच्या बेबी विकास गायकवाड यांच्या घरावर उडाल्याने त्यांच्याही घराला आग लागली. या आगीमुळे गायकवाड यांच्या घरातील दोन टीव्ही संच, होम थिएटर, कपडे, गाद्या, धान्य आदी साहित्य खाक झाले. घटनेदरम्यान, बेबी गायकवाड या एकट्याच होत्या. आगीमुळे दोन्ही घरातील विविध वस्तू जळाल्याने जवळपास दोन लाखांचे नुकसान झाले. घटनेबाबत सूचना मिळताच नगर परिषद अग्निशमन विभाग व काटोल पोलीस घटनास्थळी पोहोचले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, माजी मंत्री अनिल देशमुख, चरणसिंग ठाकूर, मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले, नगरसेवक किशोर गाढवे, गणेश चन्ने, श्रीकांत देवळे आदींनी घटनास्थळी भेट दिली. अग्निशमन विभागाचे कमलाकर वंजारी, वासुदेव शेंडे, अंबादास वरघट, पुरुषोत्तम बागडे, रामा राऊत, समीर गणवीर, गणेश राऊत यांनी आग विझविण्यासाठी मदत केली. माजी मंत्री अनिल देशमुख व चरणसिंग ठाकूर यांनी दोन्ही कुटुंबीयांचे सांत्वन करून शासकीय मदत व घरकूल योजनेतून घर देण्यात येईल, असे आश्वासन दिले. दरम्यान, आ. डॉ. आशिष देशमुख यांनी घटनास्थळाला भेट देऊन दोन्ही कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना आर्थिक मदत दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कातडे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)इजनीत घर जळालेकोदामेंढी : नजीकच्या इजनी येथे आगीमुळे घर खाक झाले. यात जीवनावश्यक घरगुती साहित्य जळाल्याने जवळपास ३ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. ही घटना शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली. इजनी येथील रहिवासी तेजराम गणपत थोटे यांच्या घराला दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळेत आगीने रौद्र रूप धारण केल्याने संपूर्ण घरगुती साहित्य जळाले. आगीच्या घटनेमुळे घरात ठेवलेले रोख ११ हजार रुपये, १ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, शिलाई मशीन, सोफा, कूलर तसेच १६ क्विंटल तांदूळ खाक झाले. माहिती मिळताच तलाठी देशमुख यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.