शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

नागपुरात गुटखा थुंकल्याने दोन गटात मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:38 AM

गुटख्याची थुंकी कपड्यावर पडल्याने दोन गटात मारहाण झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करून गोंधळ घातला. मंगळवारी रात्री यशोधरानगर परिसरातील विटभट्टी चौकात घडलेल्या या घटनेत पितापुत्र जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.

ठळक मुद्देपितापुत्र जखमी : विटभट्टी चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : गुटख्याची थुंकी कपड्यावर पडल्याने दोन गटात मारहाण झाली. दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला करून गोंधळ घातला. मंगळवारी रात्री यशोधरानगर परिसरातील विटभट्टी चौकात घडलेल्या या घटनेत पितापुत्र जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.टेका नाका येथील रहिवासी फऐजान मलिक यांच्या मामाचे विटभट्टी चौकात प्लायवूडचे दुकान आहे. दुकानाजवळच गोदाम आहे. मंगळवारी रात्री ८ वाजता ट्रकमधून प्लायवूड काढून फैजान ते गोदामात ठेवायला जात होते. प्लायवूड ठेवत असलेला मजूर आसिफने गुटखा खाल्ला होता. आसिफने पाणी पिऊन गुटखा जमिनीवर थुंकला. गोदामजवळच दारूचे आहे. त्याचवेळी दारूच्या दुकानातून धममदीपनगर येथील रहिवासी वीर निरंजन, भोला, गोलू, ताराचंद साहू बाहेर निघाले. आसिफने गुटखा थुंकल्याने त्याचे काही थेंब त्यांच्यावर पडले. यामुळे रागाच्या भरात त्यांनी फर्निचरच्या दुकानाची तोडफोड केली. या घटनेमुळे फैजान व त्याचे कुटुंबीयही दुखावले. फैजान, मुन्नाभाई, आसीफ यांनी ताराचंद साहूच्या घरावर हल्ला केला. त्याचे वडील भरत साहूला राफ्टरने मारून जखमी केले. वडिलांवर हल्ला होताना पाहून ताराचंद धावला. त्यालाही मारहाण केली. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. यशोधरानगर पोलिसांनी दोन्ही गटाविरुद्ध हल्ला व मारहाणीचा गुन्हा दाखल केला.

 

टॅग्स :Crimeगुन्हाnagpurनागपूर