शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

नागपूरला उतरणारी दोन विमानं भोपाळला वळविली!

By मोरेश्वर मानापुरे | Updated: July 20, 2024 22:42 IST

हैदराबाद-नागपूर विमान परत नागपुरात आलेच नाही

नागपूर : शनिवारी सकाळी हैदराबाद आणि लखनौहून नागपुरात येणारी दोन उड्डाणे खराब हवामानामुळे भोपाळकडे वळविण्यात आली. यापैकी हैदराबाद-नागपूरविमान भोपाळमध्ये उतरल्यानंतर नागपुरात परत येऊ शकले नाही.नागपुरात शनिवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे नागपूर विमानतळावर कमी दृश्यमानतेची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइट क्रमांक ६ए ७४५२ हैदराबाद-नागपूर सकाळी ८.१५ वाजता भोपाळकडे वळविण्यात आले. 

काही वेळानंतर इंडिगो फ्लाइट क्रमांक ६ए ७४६२ लखनौ-नागपूर हेसुद्धा सकाळी ९.१५ वाजता भोपाळला नेण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मुसळधार पावसामुळे एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमानांना उतरू दिले नाही. वास्तविक पाहता कमी दृश्यमानतेची समस्या कायम राहिली.

दोन विमानांपैकी हैदराबाद-नागपूर विमान वळविले आणि भोपाळ विमानतळावर उतरले तेव्हा त्यात तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हैदराबादहून नागपूरकडे येणारे प्रवासी भोपाळमध्येच अडकून पडले. दुसरीकडे, लखनौ-नागपूर विमान सुमारे ५ तास भोपाळमध्ये अडकल्यानंतर नागपुरात पोहोचले.

विशेष म्हणजे शुक्रवारीही मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने नागपूरच्या विमानसेवांवर परिणाम झाला होता. या दिवशी इंडिगो एअरलाइन्सची चार उड्डाणे रद्द करण्यात आली होती. याशिवाय मुंबईहून एअर इंडियाचे विमान अर्धा तास उशिराने नागपुरात पोहोचले. शुक्रवारी सकाळी सर्व्हरमध्ये समस्या आल्यानंतर एअरलाइन्सचे तिकीट, रिशेड्युलिंग, फ्लाइटची माहिती आदी सेवांवर परिणाम झाला. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सच्या काउंटरवरील बोर्डिंग पास आणि इतर कामे संगणक न वापरता हाताने करण्यात आली.

टॅग्स :nagpurनागपूरairplaneविमान