नागपूर जिल्ह्यातील माहुरझरी- फेटरी मार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू; दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 23:01 IST2021-05-10T21:41:21+5:302021-05-10T23:01:05+5:30
Accident death चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेले महिंद्रा एक्सयूव्ही वाहन राेडलगतच्या झाडावर आदळले. त्यात वाहनातील दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दाेघे गंभीर जखमी झाले. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुरझरी-फेटरी मार्गावर रविवारी (दि. ९) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.

नागपूर जिल्ह्यातील माहुरझरी- फेटरी मार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू; दोघे जखमी
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेले महिंद्रा एक्सयूव्ही वाहन राेडलगतच्या झाडावर आदळले. त्यात वाहनातील दाेघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दाेघे गंभीर जखमी झाले. ही घटना कळमेश्वर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील माहुरझरी-फेटरी मार्गावर रविवारी (दि. ९) रात्री ७.३० वाजताच्या सुमारास घडली.
दिनेश किरनाके (३०) व आशिष धुर्वे (२५) दाेघेही रा. हनुमान मंदिराजवळ, मकरधोकडा, नागपूर अशी मृतांची तर पवन किरनाके (३८, रा. हनुमान मंदिराजवळ, मकरधोकडा, नागपूर) व आकाश सोनवणे (२४, रा. सुरेंद्रगड, नागपूर) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. हे चाैघेही रविवारी रात्री एमएच-१२/एचएल-७०१० क्रमांकाच्या महिंद्रा एक्सयूव्हीने माहुरझरीहून फेटरीच्या दिशेने येत हाेते.
दरम्यान, चालक आकाश साेनवणे याचा वेगात असलेल्या या वाहनावरील ताबा सुटला आणि ते वाहन राेडलगतच्या झाडावर आदळले. यात वाहनातील चाैघेही गंभीर जखमी झाले. माहिती मिळताच प्रवीण मुंडे, नरेश नारनवरे, रवी मोहोड या पाेलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठले ताेपर्यंत दिनेश किरनाके याचा घटनास्थळीच मृत्यू झाला हाेता. पाेलिसांनी तिन्ही जखमींना उपचारासाठी लगेच नागपूर येथील मेयाे रुग्णालयात रवाना केले तर दिनेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कळमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. त्यातच आशिष धुर्वे याचा मेयाे रुग्णालयात उपचारादरम्यान काही वेळातच मृत्यू झाला. याप्रकरणी कळमेश्वर पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे.