दुचाकीने ट्रिपल सीट जात असलेल्या युवकांना मालवाहूची धडक; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 17:55 IST2022-02-14T16:14:24+5:302022-02-14T17:55:06+5:30
ठाणा शिवारात टाटा एस वाहनाने दुचाकीला जोरदार कट मारली, यामध्ये दोन तरुण ठार तर अन्य एक जखमी झाला.

दुचाकीने ट्रिपल सीट जात असलेल्या युवकांना मालवाहूची धडक; दोन ठार
नागपूर : पांजरेपार येथून उमरेडकडे दुचाकीने ट्रिपल सीट येणाऱ्या युवकांना टाटा एस वाहनाने कट मारली. या अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला तर एक युवक जखमी झाला. सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
मुकेश विनायक बांडेबुचे (३१), हरीदास देवराव ठमके (३२) अशी अपघातातमृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहे. तर, नितेश विनायक बांडेबुचे (४०) तिघेही रा. पांजरेपार पुर्नवसन, ता. भिवापूर असे या जखमीचे नाव आहे.
उमरेड येथून ६ किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणा शिवारात हा अपघात घडला. तिघेही दुचाकीने पांजरेपार येथून उमरेडला येत होते. अशातच ठाणा शिवारात असताना टाटा एस वाहनाने जोरदार कट मारली, यामध्ये दोघे ठार तर अन्य एक जखमी झाला.