मतदानाला दोन दिवस बाकी, नागपुरात परत आढळले गुन्हेगारांकडे पिस्तुल
By योगेश पांडे | Updated: April 17, 2024 17:17 IST2024-04-17T17:17:19+5:302024-04-17T17:17:52+5:30
मागील काही दिवसांपासून नागपुरात अवैध पिस्तुलविक्रीची प्रकरणे समोर येत आहेत.

मतदानाला दोन दिवस बाकी, नागपुरात परत आढळले गुन्हेगारांकडे पिस्तुल
योगेश पांडे, नागपूर : मागील काही दिवसांपासून नागपुरात अवैध पिस्तुलविक्रीची प्रकरणे समोर येत आहेत. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतदेखील आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. मतदानाला अवघे दोन दिवस बाकी असताना दोन आरोपींकडून देशी पिस्तुल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पारडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.
१६ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास पोलिसांचे पथक पेट्रोलिंग करत असताना स्मार्ट सिटी योजना, श्यामनगर येथे दोन संशयित व्यक्ती आढळले. त्यांची झडती घेतली असता कैलास गोवर्धन शाहू (३०, गुलमोहर नगर, कळमना) याच्याजवळ देशी पिस्तुल आढळली. तर गौरव उर्फ गौरीशंकर लक्ष्मण झंजाळ (२६, ठवकरवाडी, भांडेवाडी) याच्याजवळून दोन जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.