चोरीची दुचाकी, मोबाईल अन् चाकुसह दोघांना अटक
By दयानंद पाईकराव | Updated: March 30, 2024 17:18 IST2024-03-30T17:18:09+5:302024-03-30T17:18:59+5:30
चोरी केलेली दुचाकी, मोबाईल आणि दोन चाकु घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना कोराडी पोलिसांनी गजाआड करून ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

चोरीची दुचाकी, मोबाईल अन् चाकुसह दोघांना अटक
दयानंद पाईकराव, नागपूर : चोरी केलेली दुचाकी, मोबाईल आणि दोन चाकु घेऊन फिरणाऱ्या दोन आरोपींना कोराडी पोलिसांनी गजाआड करून ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अंश नितीन गजबे (२२, रा. एनआयटी गार्डनजवळ, (दत्तात्रयनगर) आणि आर्यन मदनराव मेश्राम (२०, रा. पाण्याच्या टाकीजवळ, निळकंठनगर, हुडकेश्वर नाका) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
कोराडी पोलिसांचे पथक शनिवारी पहाटे ४.४० वाजता गुन्हेगारांच्या शोधात गस्त घालत होते. तेवढ्यात त्यांना शेरे पंजाब ढाब्याजवळ, पांजरा सर्व्हिस रोड येथे एक ब्राऊन रंगाची अॅक्टीव्हा गाडी दिसली. त्यांनी चालक अंशला थांबवून त्याची व आर्यनची अंगझडती घेतली असता त्यांच्या कंबरेत ४०० रुपये व ३०० रुपये किमतीचे दोन चाकु आढळले.
अधिक चौकशी केली असता आपल्या जवळील अॅक्टीव्हा अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून तर मोबाईल शेगाव येथून चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. सहपोलिस आयुक्तांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे कोराडी ठाण्याचे उपनिरीक्षक साईप्रसाद केंद्रे यांनी आरोपींविरुद्ध कलम ४/२५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.