शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांच्या बैठकीत तेजस्वी यादव भावूक, म्हणाले, 'माझ्या जागी दुसऱ्या कोणाची तरी निवड करा'
2
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
3
८व्या वेतन आयोगापूर्वी महागाई भत्ता वाढणार का? DA ते TA पर्यंत, पाहा काय मिळणार फायदा
4
पालघर साधू हत्याकांडांतील आरोपांमुळे काशिनाथ चौधरी यांना अश्रू अनावर; "माझं राजकीय करियर..."
5
CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले
6
हायव्होल्टेज ड्रामा! "हा माझ्या मामाचा मुलगा, ८ वर्षांपासून प्रेम..."; लग्नात नवऱ्याच्या गर्लफ्रेंडची एन्ट्री
7
बँक ऑफ बडोदामधून ₹६० लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती हवी सॅलरी; किती भरावा लागेल EMI
8
Leopard: बिबट्यांच्या दहशतीवर उपाय; ‘नसबंदी’ करणार, गावात सायरन वाजणार!
9
खुशीनेच अभिषेकच्या कुटुंबाला दिला आयुष्यभराचा घाव; गर्लफ्रेंडचं टॉर्चर सहन न झाल्याने तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
10
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
11
धावपट्टीवर उतरताच विमानाला लागली आग, व्हिडिओमध्ये पहा भीषण अपघात
12
विक्रीच्या बाबतीत ही कार ठरली नंबर-1, ₹7 लाखपेक्षाही कमी आहे किंमत; मायलेज 34 km! बघा टॉप-10 कारची लिस्ट
13
Numerology: कोणत्या मूलांकाची पत्नी ठरते पतीसाठी भाग्यवान? लग्नानंतर होतो भाग्योदय
14
Thane: इतिहासाच्या पाऊलखुणा! ठाणे मनोरुग्णालयाच्या पाडकामात सापडले प्राचीन शिल्प!
15
'धनुषसाठीही करणार नाही?' मॅनेजरने केला कास्टिंग काऊचचा प्रयत्न; प्रसिद्ध अभिनेत्रीचा आरोप
16
एका महिन्यांत सोने ₹9,508 अन् चांदीच्या किमतीत ₹26,250 रुपयांची घसरण; पाहा आजचे भाव...
17
WPL 2026: मेगा लिलाव कुठे पार पडणार? किती स्लॉट भरले जाणार? संपूर्ण माहिती एका क्लिकवर
18
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
19
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
20
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘सीईओ’पद बळकावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 00:53 IST

महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शहरातील लोकप्रतिनिधींमध्ये रोष असताना, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर आता ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे (नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड) ‘सीईओ’पद बळकावले असल्याची गंभीर तक्रार गडकरी यांनी केंद्राकडे केली आहे.

ठळक मुद्देनितीन गडकरी यांची केंद्राकडे गंभीर तक्रार : कठोर कारवाई करण्याची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात शहरातील लोकप्रतिनिधींमध्ये रोष असताना, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर आता ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. तुकाराम मुंढे यांनी अवैधरीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे (नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड) ‘सीईओ’पद बळकावले असल्याची गंभीर तक्रार गडकरी यांनी केंद्राकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी केंद्रीय शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंह पुरी तसेच केंद्रीय कार्मिक व प्रशिक्षण राज्यमंत्री डॉ. जितेंद्रसिंग यांना पत्र लिहिले आहे. मुंढे यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पासाठी ‘एसव्हीपी’ची (स्पेशल पर्पज व्हेईकल) निर्मिती करण्यात आली असून, याचे नेतृत्व पूर्णकालीन ‘सीईओ’ करेल अशी तरतूद आहे. याशिवाय यात केंद्र व राज्य शासनाच्या नामनिर्देशित सदस्यांचादेखील समावेश असतो. २०१३ च्या कंपनी अ‍ॅक्टनुसार ‘एनएसएससीडीसीएल’ची नोंदणी झाली असून, नागपूर मनपा व राज्य शासनाची ही संयुक्त कंपनी आहे. यात ‘सीईओ’सोबतच मनपाचे सहा नामनिर्देशित संचालक, राज्य शासनातर्फे नामनिर्देशित चार संचालक, केंद्र शासनाकडून नामनिर्देशित एक संचालक तसेच दोन स्वतंत्र संचालकांचा समावेश आहे. मनपाच्या आयुक्तांची नियुक्ती ही नामनिर्देशित संचालक म्हणूनच होऊ शकते. ३१ डिसेंबर २०१९ पासून संचालक मंडळाची बैठकच झाली नव्हती. तुकाराम मुंढे यांची मनपाच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी अवैधरीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे ‘सीईओ’पद बळकावले. यानंतर त्यांनी संचालक मंडळाने अगोदर घेतलेले निर्णय मागे घेण्यास सुुरुवात केली. यात निविदा रद्द करणे, ‘कोरोना’च्या संकटात कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करणे, निधीची अफरातफर यासारख्या कामांचा समावेश होता. ही बाब समोर आल्यानंतर सार्वजनिक निधी हडपल्याचा आरोप लावत कंपनीचे नामनिर्देशित संचालक व महापौर संदीप जोशी यांनी मुंढे व ‘सीएफओ’विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.नियमांना धाब्यावर बसवत सुरू असलेला हा एकूणच संपूर्ण प्रकार गंभीर आहे. केंद्र शासनाकडून अनुदानित ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पाला नुकसान पोहोचविण्याचा मुंढे यांचा मानस पूर्ण होऊ नये यासाठी त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नितीन गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.परदेशींना ‘सीईओ’ नियुक्तीचे अधिकारच नाहीबेकायदेशीररीत्या ‘एनएसएससीडीसीएल’चे ‘सीईओ’पद बळकावणाऱ्या तुकाराम मुंढे यांनी चेअरमन प्रवीणसिंग परदेशी यांनी आपली नियुक्ती केल्याचा दावा प्रसारमाध्यमांसमोर केला होता. मात्र प्रत्यक्षात नियमानुसार परदेशी यांना चेअरमन या नात्याने ‘एनएसएससीडीसीएल’च्या ‘सीईओ’ची नियुक्ती करण्याचे अधिकारच नाहीत. तो अधिकार केवळ कंपनीच्या संचालक मंडळाकडे आहे, असे नितीन गडकरी यांनी या पत्राच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीtukaram mundheतुकाराम मुंढे