शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

डॉक्टरकडून १० लाख उकळण्याचा प्रयत्न : दोन उपनिरीक्षकांसह चौघे डिसमिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 1:12 AM

एका डॉक्टरला कारवाई तसेच बदनामीचा धाक दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांसह चौघांना सेवेतून निष्कासित (डिसमिस) करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी गैरप्रकाराची गय करणार नाही, असा इशारा या कारवाईतून दिल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका डॉक्टरला कारवाई तसेच बदनामीचा धाक दाखवून १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांसह चौघांना सेवेतून निष्कासित (डिसमिस) करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि सहआयुक्त रवींद्र कदम यांनी गैरप्रकाराची गय करणार नाही, असा इशारा या कारवाईतून दिल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.पोलीस उपनिरीक्षक प्रवीण घोडाम, रवीराज हलामी तसेच पोलीस शिपायी संदीप धोंगडे आणि तुषार सोनोने अशी निष्कासित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत.प्रकरण ४ वर्षांपूर्वीचे आहे. २०१५ मध्ये हे चौघे प्रतापनगर ठाण्यात कार्यरत होते. या चौघांनी संगनमत करून प्रतापनगरातील एका डॉक्टरकडे रात्रीच्या वेळी धडक दिली होती. तुमच्याकडे गैरप्रकार चालतात, अशी धमकी दाखवून डॉक्टरांच्या कर्मचाऱ्यांना कोठडीत टाकण्याचा धाक दाखवला होता. डॉक्टर यावेळी त्यांच्या घरी होते. त्यांचा एक कर्मचारी पोलिसांची डॉक्टरच्या चेंबरमध्ये समजूत काढत असताना या पोलिसांनी त्याला शिवीगाळ करून आपल्या वाहनात बसण्यास सांगितले. त्याला डॉक्टरला बोलविण्यास सांगितले. डॉक्टरने संपर्क साधला असता आरोपी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाईचे दडपण आणले. सोबत मीडिया आहे, त्यामुळे बदनामीही होईल, असा धाकही दाखवला. प्रकरण दाबायचे असेल तर १० लाख रुपये द्यावे लागतील, असे आरोपी म्हणाले. पोलिसांकडून प्रचंड दडपण आल्याने आणि आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागू शकतो, हे ध्यानात आल्यामुळे बदनामी टाळण्यासाठी डॉक्टरने रात्रीच्या वेळी आरोपी पोलिसांना ३ लाख रुपये दिले. तीन लाख मिळाल्यामुळे निर्ढावलेल्या आरोपी पोलिसांनी डॉक्टरला ब्लॅकमेल करणे सुरूच ठेवले. सात लाख रुपयांसाठी आरोपींनी डॉक्टरमागे तगादा लावला होता. रक्कम मागणारा पीएसआय घोडामची डॉक्टरने रेकॉर्डिंग केली. त्या आधारे एसीबीकडे तक्रार नोंदवली. एसीबीने सापळा रचून घोडामेला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते. यानंतर या चौघांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली होती. या चौकशीत पोलीस उपनिरीक्षक घोडाम, हलामी, शिपायी धोंगडे आणि सोनोने हे दोषी असल्याचे स्पष्ट झाले. परिणामी शुक्रवारी रात्री सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी या चौघांना पोलीस सेवेतून बरखास्त करण्याचे आदेश काढले.थेट बरखास्तीचा बडगाकोणत्याही प्रकरणात आधी निलंबित केले जाते. नंतरच्या चौकशीत दोषी आढळल्यास त्या अधिकारी, कर्मचाऱ्याला सेवेतून बरखास्त केले जाते. या प्रकरणात घोडामला एसीबीने पकडल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले होते. सध्या घोडाम आणि हलामी कंट्रोल रूममध्ये तर धोंगडे आणि सोनोने पोलीस मुख्यालयात संलग्न आहेत. आता प्रदीर्घ चौकशीत त्याच्यासह अन्य तिघांवर निलंबनाऐवजी थेट बरखास्तीचाच बडगा उगारण्यात आल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.गुन्हेगाराला धरले होते हाताशीया प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक घोडाम, हलामी, शिपायी धोंगडे आणि सोनोने या चौघांनी डॉक्टरला ब्लॅकमेल करताना कुख्यात गुन्हेगारालाही हाताशी धरले होते. अनेक गंभीर गुन्ह्यांचा आरोपी असलेला सूरज लोलगे याला सात लाख रुपयांची रक्कम आणण्यासाठी वारंवार डॉक्टरकडे पाठविले होते. विशेष म्हणजे, पोलीस उपनिरीक्षक घोडाम, हलामी, शिपायी धोंगडे आणि सोनोने या चौघांनी डॉक्टरच्या दवाखान्यात जाण्यापासून तो कारवाईचा धाक दाखवण्यापर्यंत कसल्याही प्रकारची नोंद स्टेशन डायरीत केली नव्हती.

 

टॅग्स :ExtortionखंडणीPoliceपोलिसdoctorडॉक्टर