नागपुरात पोलीस उपायुक्तांच्या कारला ट्रकची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 22:27 IST2020-06-26T22:26:18+5:302020-06-26T22:27:27+5:30

सिग्नलवर उभ्या असलेल्या पोलीस उपायुक्तांच्या शासकीय कारला ट्रकचालकाने धडक मारली. कारमध्ये परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल बसून होते. प्रसंगावधान राखून ते दुसऱ्या दिशेला सरकल्याने त्यांना किंवा कारमधील कुणालाच दुखापत झाली नाही.

Truck hits Deputy Commissioner of Police's car in Nagpur | नागपुरात पोलीस उपायुक्तांच्या कारला ट्रकची धडक

नागपुरात पोलीस उपायुक्तांच्या कारला ट्रकची धडक

ठळक मुद्देकारचे नुकसान : सुदैवाने मोठा अपघात टळला

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सिग्नलवर उभ्या असलेल्या पोलीस उपायुक्तांच्या शासकीय कारला ट्रकचालकाने धडक मारली. कारमध्ये परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल बसून होते. प्रसंगावधान राखून ते दुसऱ्या दिशेला सरकल्याने त्यांना किंवा कारमधील कुणालाच दुखापत झाली नाही.
पोलीस उपायुक्त नीलोत्पल शुक्रवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मार्टिन नगर ते आॅटोमोटिव्ह चौक मार्गावरून शासकीय कारने जात होते. खोब्रागडे चौकातील सिग्नल बंद असल्याने चालकाने कार उभी केली. तेवढ्यात घाईगडबडीत आलेल्या एका ट्रक चालकाने या कारला धडक मारली. त्यामुळे कारचे मोठे नुकसान झाले. कारमध्ये बसून असलेले पोलीस उपायुक्त नीलोत्पल, त्यांचा गार्ड आणि वाहन चालक या तिघांपैकी कुणालाही कोणतीही दुखापत झाली नाही. कारला धडक लागल्याचे लक्षात येताच ट्रकचालकाने ट्रक बंद केला. सिग्नल वरील इतर वाहनचालकांनी त्याच्याकडे धाव घेतली. मात्र पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेऊन नागरिकांच्या मारहाणीपासून त्याचा बचाव केला. आरोपी ट्रकचालकाचे नाव शेख जफुल शेख हबीब असे असून तो पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समजते. जरीपटका पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Web Title: Truck hits Deputy Commissioner of Police's car in Nagpur