ट्रकची अॅक्टिव्हाला धडक, युवक जागीच ठार
By दयानंद पाईकराव | Updated: November 25, 2023 17:03 IST2023-11-25T17:02:02+5:302023-11-25T17:03:37+5:30
नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना

ट्रकची अॅक्टिव्हाला धडक, युवक जागीच ठार
नागपूर : भरधाव ट्रकने अॅक्टिव्हाला धडक दिल्यामुळे २२ वर्षाचा युवक जागीच ठार झाला. तर त्याचा मित्र जखमी झाल्याची घटना नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी दुपारी १.३० ते २ वाजताच्या दरम्यान घडली.
वंश चंद्रशेखर वानखेडे (वय २२, रा. जयभीम चौक, कामठी) असे या अपघातातमृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. तो आपल्या मित्रासोबत अॅक्टिव्हा क्रमांक एम. एच. ४०, बी. वाय-७९८८ ने जात होता.
ट्रक क्रमांक एम. एच. ४०, वाय-०८७१ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून वंशच्या अॅक्टिव्हाला धडक दिली. यात वंश गंभीर जखमी होऊन त्याचा मित्र किरकोळ जखमी झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. वंशला उपचारासाठी कामठीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वंशचे वडिल चंद्रशेखर बाबुराव वानखेडे (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नविन कामठी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ३०४ (अ), सहकलम १३४, १७७, १८४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.