नागपुरात बेलोरो-ट्रकची धडक; दोन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 13:39 IST2020-01-14T13:39:26+5:302020-01-14T13:39:52+5:30
भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने बेलोरो पिकअप वाहनाला दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार तर दहाजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

नागपुरात बेलोरो-ट्रकची धडक; दोन ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने बेलोरो पिकअप वाहनाला दिलेल्या धडकेत दोन जण जागीच ठार तर दहाजण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी सकाळी ७ च्या सुमारास घडली. हुडकेश्वरकडे जाणाऱ्या ट्रकने म्हाळगीनगर चौकात बेलोरो पिकअप वाहनाला धडक दिली. यातील सर्व प्रवासी हे मध्यप्रदेशातील आहेत.
ही धडक इतकी जबरदस्त होती की, तीत दोन जण ठार झाले आणि दहाजण जखमी झाले.
मृतांमध्ये राहूल बंसी व भैरू गौड यांचा समावेश आहे.