शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
3
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
4
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
5
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
6
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
8
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
9
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
10
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
11
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
12
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
13
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
14
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
15
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?
16
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
17
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
18
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
19
Mumbai: केतकीपाडा, फिल्मसिटी, दामूनगर येथील झोपड्यांवरील कारवाईला आठ दिवसांची मुदतवाढ
20
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...

वारंवार लोडशेडिंगचा त्रास? आता फोन, SMS, किंवा फेसबुकवरून करा तक्रार

By शुभांगी काळमेघ | Updated: May 5, 2025 17:45 IST

Nagpur : वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणकडून तक्रार नोंदवण्यासाठी टोल-फ्री क्रमांक, ऑनलाइन पोर्टल, सोशल मीडिया, एसएमएस आणि प्रत्यक्ष भेटीचे विविध पर्याय उपलब्ध

नागपूर : राज्यभरात उन्हामुळे आधीच त्रस्त झालेल्या नागरिकांना बऱ्याच ठिकाणी लोडशेडिंगचा मार सहन करावा लागत आहे. त्यात अवकाळी पाऊस आणि वाऱ्याचे कारण पाहता शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. राज्यभरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटना घडत असताना, महावितरण (MSEDCL) ने ग्राहकांसाठी तक्रार नोंदवण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी अशा वेळी घाबरून न जाता खालीलपैकी कोणताही पर्याय निवडून तक्रार नोंदवू शकतात. 

टोल-फ्री क्रमांकांवर तक्रार नोंदवा वीज गेल्यास तुम्ही २४ तास सेवा देणाऱ्या खालील टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधू शकता. 1912, 19120, 1800-212-3435, 1800-233-3435या क्रमांकांवर कॉल करून तुम्हाला तांत्रिक अडचणीसाठी मदत मिळू शकते.

ऑनलाइन सेवा – WSS पोर्टलमहावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर WSS (Web Self Service) पोर्टल मिळेल, जिथे तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता. तुम्ही या पोर्टलवर लॉगिन करून तक्रार नोंदवू शकता आणि त्याची स्थिती सुद्धा तपासू शकता.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापरतुम्ही तक्रार नोंदवण्यासाठी महावितरणच्या फेसबुक आणि एक्स पेजवर सुद्धा संपर्क करू शकता. महावितरणद्वारे सोशल मीडियावरील तक्रारींना देखील प्रतिसाद देण्यात येतो.

एसएमएसद्वारे तक्रारफोन किंवा इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यास, तुम्ही 9930399303 या क्रमांकावर "NOPOWER <12 अंकी ग्राहक क्रमांक>" असा SMS पाठवून तक्रार नोंदवू शकता. ही सेवा ग्रामीण भागात अधिक फायद्याची ठरते.

प्रत्यक्ष भेटीची सुविधाज्यांना प्रत्यक्षपणे तक्रार नोंदवायची असेल, त्यांनी आपल्या जवळच्या महावितरण कार्यालय, विभागीय कार्यालय किंवा ग्राहक सेवा केंद्रात भेट देऊन तक्रार नोंदवावी.

ग्राहकांसाठी सूचनामहावितरणकडून ग्राहकांच्या सोयीसाठी हे सर्व पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास कोणत्याही एका माध्यमातून तक्रार नोंदवून समाधान मिळवता येऊ शकते.

टॅग्स :electricityवीजmahavitaranमहावितरणnagpurनागपूर