वारंवार लोडशेडिंगचा त्रास? आता फोन, SMS, किंवा फेसबुकवरून करा तक्रार
By शुभांगी काळमेघ | Updated: May 5, 2025 17:45 IST2025-05-05T17:44:32+5:302025-05-05T17:45:07+5:30
Nagpur : वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणकडून तक्रार नोंदवण्यासाठी टोल-फ्री क्रमांक, ऑनलाइन पोर्टल, सोशल मीडिया, एसएमएस आणि प्रत्यक्ष भेटीचे विविध पर्याय उपलब्ध

Troubled by frequent load shedding? Now complain via phone, SMS, or Facebook
नागपूर : राज्यभरात उन्हामुळे आधीच त्रस्त झालेल्या नागरिकांना बऱ्याच ठिकाणी लोडशेडिंगचा मार सहन करावा लागत आहे. त्यात अवकाळी पाऊस आणि वाऱ्याचे कारण पाहता शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. राज्यभरातील अनेक भागांमध्ये वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याच्या घटना घडत असताना, महावितरण (MSEDCL) ने ग्राहकांसाठी तक्रार नोंदवण्याचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी अशा वेळी घाबरून न जाता खालीलपैकी कोणताही पर्याय निवडून तक्रार नोंदवू शकतात.
टोल-फ्री क्रमांकांवर तक्रार नोंदवा
वीज गेल्यास तुम्ही २४ तास सेवा देणाऱ्या खालील टोल-फ्री क्रमांकांवर संपर्क साधू शकता. 1912, 19120, 1800-212-3435, 1800-233-3435
या क्रमांकांवर कॉल करून तुम्हाला तांत्रिक अडचणीसाठी मदत मिळू शकते.
ऑनलाइन सेवा – WSS पोर्टल
महावितरणच्या अधिकृत वेबसाइटवर WSS (Web Self Service) पोर्टल मिळेल, जिथे तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता. तुम्ही या पोर्टलवर लॉगिन करून तक्रार नोंदवू शकता आणि त्याची स्थिती सुद्धा तपासू शकता.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापर
तुम्ही तक्रार नोंदवण्यासाठी महावितरणच्या फेसबुक आणि एक्स पेजवर सुद्धा संपर्क करू शकता. महावितरणद्वारे सोशल मीडियावरील तक्रारींना देखील प्रतिसाद देण्यात येतो.
एसएमएसद्वारे तक्रार
फोन किंवा इंटरनेट सेवा उपलब्ध नसल्यास, तुम्ही 9930399303 या क्रमांकावर "NOPOWER <12 अंकी ग्राहक क्रमांक>" असा SMS पाठवून तक्रार नोंदवू शकता. ही सेवा ग्रामीण भागात अधिक फायद्याची ठरते.
प्रत्यक्ष भेटीची सुविधा
ज्यांना प्रत्यक्षपणे तक्रार नोंदवायची असेल, त्यांनी आपल्या जवळच्या महावितरण कार्यालय, विभागीय कार्यालय किंवा ग्राहक सेवा केंद्रात भेट देऊन तक्रार नोंदवावी.
ग्राहकांसाठी सूचना
महावितरणकडून ग्राहकांच्या सोयीसाठी हे सर्व पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास कोणत्याही एका माध्यमातून तक्रार नोंदवून समाधान मिळवता येऊ शकते.