उमरेड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, चार ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 06:57 IST2019-07-08T00:09:57+5:302019-07-08T06:57:40+5:30
सात गंभीर : उमरेड-नागपूर महामार्गावर अपघात

उमरेड-नागपूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक, चार ठार
उमरेड/कुही : नागपूरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाºया ट्रॅव्हल्सने रेतीच्या उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. सदर अपघातात चार जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या भीषण अपघातात नेमके किती जण मरण पावले, याबाबत वेगवेगळी आकडेवारी सोशल मीडियावर पसरविली जात होती. पोलीस विभागाकडेही याबाबतची नेमकी माहिती मिळाली नाही. मात्र नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रानुसार या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.
यात नागपूरच्या दिघोरी येथील राहणारे अनिल कवटे, प्रमिला कवटे आणि ट्रॅव्हल्सच्या चालक कार्तिक डोंगल याच्यासह सोनू नावाच्या युवकाचा मृतात समावेश असल्याचे सांगण्यात आले. या अपघातात सात जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील पाच जणांवर ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. वडसा येथून नागपूरच्या दिशेने महालक्ष्मी ट्रॅव्हल्स एम.एच.४९/एटी ६७५४ ही उमरेड येथून रात्री ८ वाजताच्या सुमारास नागपूरकडे निघाली. अशातच कुही फाट्यालगत रेतीच्या उभ्या ट्रकला (ट्रक क्रमांक एमएच ३१/सीबी ७६५६) जोरदार धडक लागली.
ट्रॅव्हल्समध्ये ४० च्या आसपास प्रवासी होते, अशी माहिती आहे. सदर अपघातात १५ ते २० जण जखमी झाले असून, गंभीर जखमींची संख्या सात इतकी असल्याची प्राथमिक माहिती आहे. पावसामुऴे अपघातांचे प्रमाण वाढले आहे.