शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

नागपुरात मेट्रोतर्फे मॉक ड्रिलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 12:23 AM

महामेट्रो नागपूर प्रकल्पात कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महामेट्रोतर्फे वर्धा मार्गावरील उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनजवळ सेफ्टी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.

ठळक मुद्देआतापर्यंत १८० मॉक ड्रिल : सेफ्टी मॉक ड्रिल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रो नागपूर प्रकल्पात कार्य करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी महामेट्रोतर्फे वर्धा मार्गावरील उज्ज्वलनगर मेट्रो स्टेशनजवळ सेफ्टी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले. आपात्कालीन परिस्थितीत सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यात आली.आणीबाणीची परिस्थिती उद्भवली तर त्यात अडकलेल्या व्यक्तींच्या बचावाकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजना सांगण्यात आल्या. बचाव प्रक्रियेमध्ये बचाव तंत्र आणि यंत्रणांचा कसा वापर करावा? अचानक घडलेल्या घटनेला कारणीभूत बाबींचे निरीक्षण करून आवश्यक नोंदी करणे का आवश्यक आहे? याचे महत्त्व पटवून देत कार्यस्थळी उद्भवणाऱ्या धोक्यासंबंधी सविस्तर माहिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात आली.या मॉक ड्रिलअंतर्गत एक कर्मचारी तब्बल ३० फुटापेक्षा जास्त उंचीवर अडकला होता. त्याच्या बचावासाठी नाट्यमय पद्धतीने इतर कर्मचारी धावपळ करीत आवश्यक उपकरणे गोळा करीत होते. त्यानंतर नियोजित पद्धतीने उंचीवर अडकलेल्या कर्मचाऱ्याला वाचविण्यात आले. त्याला लगेचच आवश्यक त्या सर्व सोईसुविधा पुरविण्यात आल्या. कर्मचाऱ्याला सुरक्षितपणे वाचविल्यानंतरच आवश्यकतेनुसार वैद्यकीय तपासणी करून घटनेतील परिस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले.महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे प्रकल्पांच्या विविध कार्यस्थळांवर मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येते. एका मॉक ड्रिलमध्ये किमान २० कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. आतापर्यंत १८० पेक्षा जास्त मॉक ड्रिलचे आयोजन महामेट्रोतर्फे करण्यात आले असून, सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांनी याचा लाभ घेतला आहे. महामेट्रोतर्फे वेळोवेळी अशाप्रकारे मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येते. जमिनीच्या एका विशिष्ट उंचीवर दोराला धरून काम करणाऱ्या कामगारांपासून मॉक ड्रिलची सुरुवात होते.आंतरराष्ट्रीय मानकानुसार उंचीवर काम करताना जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी साधारणत: ३० मिनिटाचा कालावधी लागतो. मात्र, महामेट्रोने मॉक ड्रिलच्या माध्यमाने केवळ ११ मिनिटात कशाप्रकारे या कर्मचाऱ्यांना वाचविता येऊ शकते, हे सिद्ध करून दाखविले. मॉक ड्रिलदरम्यान नागपूर वाहतूक पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. वाहतूक अधिकाऱ्यांनी काही आवश्यक व महत्त्वाच्या घटकांची जाणीव उपस्थितांना करून दिली.

 

टॅग्स :Metroमेट्रोEmployeeकर्मचारी