शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकावरील बॅग स्कॅनर पुन्हा बंद

By admin | Updated: July 13, 2016 03:30 IST

आठ दिवसांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकावरील पश्चिमेकडील भागात असलेले बॅग स्कॅनर बंद पडल्यामुळे जवळपास

सुरक्षा ऐरणीवर : विना तपासणी सामान जातेय रेल्वेगाड्यात नागपूर : आठ दिवसांपूर्वी नागपूर रेल्वे स्थानकावरील पश्चिमेकडील भागात असलेले बॅग स्कॅनर बंद पडल्यामुळे जवळपास चार दिवस प्रवाशांच्या बॅग तपासणीविना आत जात होत्या. दरम्यान, बॅग स्कॅनरची दुरुस्ती करून ते सुरू करण्यात आले. परंतु सोमवारी दुपारपासून पुन्हा हे बॅग स्कॅनर बंद पडल्यामुळे प्रवासी त्यांच्या बॅग, साहित्याची तपासणी न करताच आत शिरताना दिसले. नागपूर रेल्वे स्थानकावर पूर्व आणि पश्चिमेकडील भागात एक असे दोन बॅग स्कॅनर आहेत. आठ दिवसांपूर्वी पश्चिमेकडील बॅग स्कॅनरचा बेल्ट तुटल्यामुळे हे बॅग स्कॅनर बंद पडले होते. चार दिवस उलटूनही हे बॅग स्कॅनर दुरुस्त करण्यात आलेले नव्हते. यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकून या गंभीर बाबीकडे रेल्वे सुरक्षा दलाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर हे बॅग स्कॅनर दुरुस्त करण्यात आले. परंतु या घटनेचा पाच दिवसांचा कालावधी उलटत नाही, तोच पुन्हा पश्चिमेकडील भागात असलेले बॅग स्कॅनर सोमवारी दुपारपासून बंद पडले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत प्रवासी त्यांच्या बॅग, सामानाची तपासणी न करताच रेल्वे स्थानकात शिरताना दिसले. नागपूर रेल्वे स्थानक हे देशातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. देशात कुठेही अप्रिय घटना घडल्यास नागपूर रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट जारी करण्यात येतो. परंतु तरीसुद्धा बॅग स्कॅनर बंद पडल्यानंतर ते त्वरित दुरुस्त करण्याची यंत्रणा रेल्वे सुरक्षा दलाकडे नाही. त्यामुळे वारंवार बंद पडणाऱ्या बॅग स्कॅनरबाबत कडक उपाययोजना करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या गंभीर बाबीकडे लक्ष पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)