चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा ट्रेलर चालकाने घेतला बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 00:11 IST2018-09-21T00:09:35+5:302018-09-21T00:11:24+5:30

निष्काळजीपणे वाहन चालवून चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा एका ट्रेलर चालकाने बळी घेतला. बुधवारी मध्यरात्रीनंतर कळमना चिखली रेल्वे यार्डात हा अपघात घडला. सोमाबाई रेखचंद धारणे (वय ७०, पारधी टोळी, नागभीड, चंद्रपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.

Trailer driver took the life of An elderly woman from Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा ट्रेलर चालकाने घेतला बळी

चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा ट्रेलर चालकाने घेतला बळी

ठळक मुद्देकळमना चिखली रेल्वे यार्डात अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निष्काळजीपणे वाहन चालवून चंद्रपूर जिल्ह्यातील वृद्धेचा एका ट्रेलर चालकाने बळी घेतला. बुधवारी मध्यरात्रीनंतर कळमना चिखली रेल्वे यार्डात हा अपघात घडला. सोमाबाई रेखचंद धारणे (वय ७०, पारधी टोळी, नागभीड, चंद्रपूर) असे मृत महिलेचे नाव आहे.
नागभीडच्या पारधी बेड्यावर राहणारी वृद्ध सोमाबाई, रेखा विलास धारणे (वय ५०) आणि अन्य काही महिला कामाच्या निमित्ताने नागपुरात आल्या होत्या. बुधवारी रात्री त्या सर्व चिखलीच्या रेल्वे यार्डात बसून होत्या. तेथे हजर असलेल्या एका आरोपी ट्रेलरचालकाने मागे वाहक उभा न करता निष्काळजीपणे वाहन मागे घेतले आणि वृद्ध सोमाबाई धारणेला धडक मारून तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरला. रेखा धारणे यांच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

Web Title: Trailer driver took the life of An elderly woman from Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.