टीव्ही अंगावर पडून चिमुकलीचा करुण अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 21:52 IST2020-03-13T21:50:56+5:302020-03-13T21:52:30+5:30
टेबलवर ठेवलेला टीव्ही अंगावर पडून दोन वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोका बुद्ध विहाराजवळ शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली.

टीव्ही अंगावर पडून चिमुकलीचा करुण अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : टेबलवर ठेवलेला टीव्ही अंगावर पडून दोन वर्षीय चिमुकलीचा करुण अंत झाला. कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोका बुद्ध विहाराजवळ शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास ही घटना घडली. प्राप्ती अजय उके असे या चिमुकलीचे नाव आहे.
शुक्रवारी सकाळी चिमुकली प्राप्ती घरात खेळत होती. खेळता खेळता ती टेबलजवळ गेली. टेबलला धरल्यामुळे तो हलला आणि टेबलवर ठेवलेला टीव्ही सरळ प्राप्तीच्या डोक्यावर पडला. त्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. जखमी चिमुकलीला मेयोत नेले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.