शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

मालवाहतूक चालकांना वाहतुकीचे धडे

By admin | Updated: May 23, 2014 00:59 IST

मालवाहतूकचालक वर्षानुवर्षे देशभरात मालवाहतूक करीत असतात. एकच एक काम करीत असल्यामुळे अनेकांमध्ये फाजील आत्मविश्वास निर्माण होतो. यातच प्रवास मोठा असल्याने

अपघात कमी करण्यासाठी आरटीओचा उपक्रम : ३० हजार चालकांचे केले प्रबोधन

नागपूर : मालवाहतूकचालक वर्षानुवर्षे देशभरात मालवाहतूक करीत असतात. एकच एक काम करीत असल्यामुळे अनेकांमध्ये फाजील आत्मविश्वास निर्माण होतो. यातच प्रवास मोठा असल्याने वेगावर नियंत्रण राहत नाही. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. याला लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने, ‘जनआक्रोश’ या सामाजिक संघटनेच्या सहकार्याने मालवाहतूक चालकांसाठी प्रबोधन वर्ग सुरू केले आहेत. आतापर्यंत ३० हजार चालकांचे प्रबोधन करण्यात त्यांना यश मिळाले आहे. गेल्या काही वर्षांत रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरी, सहापदरी झाले आहेत. ग्रामीण भागातील रस्तेही चांगले झाले. पण अपघातांची संख्या मात्र कमी झाली नाही. अपघातांचे वाढते प्रमाण ही राष्ट्रीय समस्या झाली आहे. रस्त्यांच्या अपघातात दरवर्षी १ लाख ४० हजार नागरिक मृत्युमुखी पडतात. जखमींची संख्याही दरवर्षी २ लाखांच्या आसपास असल्याने, वाहनचालकांना सक्तीने वाहतुकीच्या नियमांचे पालन करायला भाग पाडण्याशिवाय सरकारसमोर पर्याय नाही. विशेषत: महामार्गावर अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे दगावणार्‍यांच्या वाढत्या प्रमाणाला रोखण्यासाठी आरटीओ, शहरने २०१२ पासून एक अभियान हाती घेतले. यात मालवाहतूक चालकाला परवाना (ट्रान्सपोर्ट लायसन्स) देण्यापूर्वी किंवा त्याचे नूतनीकरण करण्यापूर्वी त्याचे दोन तास प्रबोधन केले जाते. मोटार वाहन निरीक्षक आणि जनआक्रोशचे सदस्य चित्रफितीच्या मदतीन हे प्रबोधनाचे वर्ग घेतात. यात चालकाच्या होत असलेल्या चुका, त्यामुळे घडत असलेला अपघात यावर मार्गदर्शन केले जाते. अपघात झाल्यास काय करावे, याची प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाते. चौपदरी रस्त्यावर जड वाहन असल्यास वाहनचालकाने डाव्या बाजूच्या लाईनमधूनच वाहन चालविणे, या सारख्या नवीन नियमांवर चर्चा आणि त्यातून मार्गदर्शन केले जाते. आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी हे वर्ग घेतले जातात. या वर्गात उपस्थित असलेल्या चालकांनाच परवान्याची पुढील प्रक्रिया पूर्ण होते. राज्यात बोटावर मोजण्याइतक्या आरटीओ कार्यालयात ही मोहीम सुरू आहे. त्यात शहर आरटीओ कार्यालय आघाडीवर आहे. आतापर्यंत ३० हजार मालवाहतूक चालकांचे प्रबोधन करण्यात आले आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) रवींद्र भुयार आणि जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांच्या नेतृत्वात हे वर्ग सुरू आहेत. (प्रतिनिधी)