शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी त्रस्त, मात्र दहशतीत

By admin | Updated: November 19, 2016 02:36 IST

केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर विविध बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे.

सरकारच्या विरोधात चुप्पी : स्थिती पूर्ववत होण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागणारनागपूर : केंद्र सरकारने ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर विविध बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. छोट्या नोटा चलनात नाहीत. ग्राहकांनी बाजाराकडे पाठ फिरविली असून ते केवळ जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करीत आहेत. सर्वच बाजारात व्यवसाय ३० टक्क्यांपर्यंत घसरला असून पुरवठ्याअभावी वस्तूंचे भाव वधारले आहेत. व्याजाने घेतलेल्या पैसा परतीची व्यावसायिकांना चिंता आहे. दुकानदारांनी माल खरेदी केला आहे, पण विक्री नसल्यामुळे तो पडून आहे. व्यवसायाची साखळी खंडित झाल्यामुळे व्यापारी चिंताग्रस्त असून चक्रव्यूहात सापडला आहे. विविध बाजारपेठांमध्ये व्यापारी त्रस्त आणि दहशतीत आहे. छोट्या नोटा चलनात आल्यानंतरही बाजारातील मंदी दूर होण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी लागेल. किराणा, खाद्यतेल, धान्य बाजारातील व्यावसायिकांनी ग्राहकांच्या सोयीसाठी डेबिट कार्डच्या माध्यमातून विक्री करण्यासाठी ‘टेलर मशीन’चा अवलंब करण्याचा निर्णय घेतल्याची प्रतिक्रिया विविध बाजारपेठांच्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. नवीन खरेदी बंदनवीन नोटा चलनात अजूनही न आल्यामुळे बाजारात मंदीचे वातावरण आहे. दुकानदारांकडे माल पडून आहे. नवीन खरेदी बंद आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात येथील कृषी बाजारपेठा बंद आहेत. शेतकऱ्यांनी रोखीची मागणी केल्याने कृषी मालाची विक्री बंद आहे. कामगार आणि मजुरांना काम नाही. सर्वाधिक त्रास त्यांना होत आहे. जुन्या व्यापाऱ्यांनी रोख आणि धनादेशाने व्यवहार केला आहे. पण आता नवीन पिढीने डेबिट कार्डद्वारे व्यवहार करण्यासाठी ‘टेलर मशीन’ खरेदीसाठी बँकेकडे धाव घेतली आहे. परिस्थिती लवकरच सुरळीत होईल, अशी अपेक्षा मसाले बाजारातील व्यावसायिक चंदन गोस्वामी यांनी व्यक्त केली. खाद्यतेल बाजारात मंदी५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद केल्यामुळे इतवारीतील खाद्यतेल बाजारपेठेत मंदी आहे. व्यवसायात ३० टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. लग्नाचा हंगाम आहे, पण विक्री अत्यल्प आहे. कोणत्याही दुकानदारांची सरकारच्या विरोधात बोलण्याची हिंमत नाही. शिवाय आयकर खात्याची भीती आहे. नागरिक त्रस्त आहेत, पण भविष्य चांगले आहे. ८० टक्के व्यवसाय रोखीने होतो. पण आता नोट मोजण्याची आणि ‘टेलर मशीन’ लावण्याची गरज पडली आहे. पुढे या मशीनद्वारे कॅशलेस व्यवहार होणार आहे. त्यामुळे व्यवसायात पारदर्शकता येईल, अशी प्रतिक्रिया इतवारीतील खाद्यतेल विक्रेते अनिलकुमार अग्रवाल यांनी दिली.