शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
2
India Womens T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
3
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
4
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
5
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
6
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
7
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
9
७ वर्षांच्या इशांकचा भीमपराक्रम! श्रीलंका ते भारत २९ किमी अंतर नऊ तास पोहून गाठले; विश्वविक्रमाची नोंद
10
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
11
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
12
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
13
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
14
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
15
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
16
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
17
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
18
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
19
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
20
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील तलाव होणार पर्यटन स्थळे

By admin | Updated: May 1, 2016 02:59 IST

शहरातील मध्य नागपुरात असलेले लेंडी व नाईक तलाव तसेच सोनेगाव व गांधीसागर या चारही तलावांच्या सौंदर्यीकरणासाठीचे....

लेंडी, नाईक, सोनेगाव व गांधीसागरचा समावेश : पालकमंत्र्यांनी दिल्या प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनानागपूर : शहरातील मध्य नागपुरात असलेले लेंडी व नाईक तलाव तसेच सोनेगाव व गांधीसागर या चारही तलावांच्या सौंदर्यीकरणासाठीचे प्रस्ताव पर्यटनाच्या दृष्टीने तयार करा. यासाठी लागणारा निधी पर्यटन विभागाकडून आपण उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.रविभवनात आमदार विकास कुंभारे व अन्य नागरिकांच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला. लेंडी व नाईक तलावासंदर्भात बोलताना आमदार विकास कुंभारे यांनी सांगितले की, ती६न वर्षापासून आपण पाठपुरावा करीत आहोत. लेंडी तलावाचे सर्वेक्षण झाले. या तलावाशेजारी झोपडपट्टी होती. झोपडीवाल्यांनी गुंडांना आपल्या जागा विकल्या. आता येथे गुंडागिरी सुरू आहे. तलावाच्या शेजारी व जागेवर असलेले अतिक्रमण काढले जात नाही. अतिक्रमण काढण्यासाठी मनपाला पत्र पाठवले पण कारवाई झाली नाही. मूळ जागा नझुलची आहे. लोकांनी बांधकामे केली आहेत पण नझुलनेही अतिक्रमण हटवले नाही. किमान २००० नंतरचे अतिक्रमण तरी हटवायला हवे होते. जिल्हाधिकाऱ्यांकडेही यासाठी पत्र व्यवहार केला.या संदर्भात मनपाचे सहायक आयुक्त राऊत यांनी सांगितले की, नगर भूमापन अधिकाऱ्यांनी तलावाचे सीमांकन करून द्यावे. पण तहसिलदारांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही. या तलावाची एकूण २६ एकर जागा असून त्यापैकी ८ एकर जागेवर तलाव आहे. उर्वरित जागेवर अतिक्रमण आहे. त्यामुळे या तलावाचा सौंदर्यीकरणाचा ९ कोटीचा विकास आराखडा तयार असूनही त्याची अंमलबजावणी करता येत नाही. अनेकांनी या तलावात ड्रेनेज लाईनही सोडल्या आहेत. त्यामुळे तलावाचे पाणी अत्यंत घाण झाले आहेत. २००० नंतरचे अतिक्रमण काढल्यानंतर विकास आराखड्याची अंमलबजावणी करणे शक्य होईल, असे पालकमंत्री म्हणाले.नाईक तलाव हा एकूण ४२ एकर जागेवर असून ही जमीन नगरनाईक काळे यांची जागा आहे. ८ एकरवर तलाव असून उर्वरित जागा अतिक्रमणाने व्यापली आहे. नाईक तलावाच्या कंपाऊंड वॉलचे अर्धे कामही झाले आहे. तलावात ज्यांची घरे होती त्यांना घरे दिली आहेत. पण लेंडी तलावाचे घाण पाणी नाईक तलावात सोडले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. भोसलेकालीन हा तलाव अत्यंत सुंदर होता. यावर पालकमंत्री म्हणाले सौंदर्यीकरण, गाळ काढणे, स्वच्छता करणे, गडर लाईन अन्य भागातून वळवणे असा प्रस्ताव तयार करा. दोन्ही तलावाबाबत मनपा प्रशासनात उदासीनता असल्याचे आढळले.शहरातील लेंडी, नाईक, सोनेगाव व गांधीसागर तलावाच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करून पर्यटन विभागाकडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर करा. पर्यटन विभागाकडून या तलावांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने निधी मिळवून सौंदर्यीकरण करू. (प्रतिनिधी)