शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय तंत्रनिकेतनचा आज दीक्षांत समारंभ

By admin | Updated: February 11, 2016 03:30 IST

स्थापनेची १०० वर्षे साजरी करीत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनचा १८ वा दीक्षांत सोहळा गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.

नागपूर : स्थापनेची १०० वर्षे साजरी करीत असलेल्या शासकीय तंत्रनिकेतनचा १८ वा दीक्षांत सोहळा गुरुवार ११ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ११ वाजता तंत्रनिकेतनच्या परिसरात होणाऱ्या या सोहळ्यात ७०० हून अधिक विद्यार्थ्यांना पदविका प्रदान करण्यात येणार आहेत. दीक्षांत समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर मेट्रो रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रजेश दीक्षित हे उपस्थित राहणार आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक गुलाबराव ठाकरे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावर्षी सर्वाधिक आठ सुवर्ण पदके ‘मेकॅनिकल’ विभागात अव्वल क्रमांक पटकाविणाऱ्या गौरव आरेकर याला प्रदान करण्यात येतील. यापाठोपाठ प्रिया रुठिया हिचा चार तर यश शाहू याचा तीन सुवर्ण पदके देऊन सत्कार करण्यात येईल. यावर्षी दोन नव्या पदकांचा समावेश दीक्षांत समारंभात करण्यात आला आहे. एकूण २८ पदके कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात येतील. पत्रकार परिषदेला गुलाबराव ठाकरे, प्राचार्य डॉ. सी.एस. थोरात, परीक्षा नियंत्रक वाय.बी. दुपारे आणि टेक्सटाईल विभागाचे प्रमुख डॉ. दीपक कुळकर्णी उपस्थित होते. पुरस्कार मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जुळ्या बहिणी तसेच जुळ्या भावांचा समावेश आहे. अजिंक्य आणि आदित्य पंचबुधे तसेच निधी व विधी जोशी यांचा यावेळी सत्कार होईल. (प्रतिनिधी)