शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

आरडीएसओच्या परीक्षणापूर्वी आज ‘माझी मेट्रो’रुळावर धावणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 11:50 PM

महामेट्रो नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या परीक्षणासाठी ‘आरडीएसओ’ची (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) चमू आता १६ फेब्रुवारीला नागपुरात येणार आहे. त्यापूर्वी बुधवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बुलंद शंटिंग इंजिनद्वारे रुळाची पाहणी केली आणि विकास कामांचा आढावा घेतला. गुरुवारी रात्री महामेट्रोतर्फे मेट्रोचा ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार असून ‘माझी मेट्रो’ रुळावर धावताना दिसणार आहे.

ठळक मुद्दे दीक्षित यांच्यातर्फे बुलंद शंटिंग इंजिनद्वारे ‘सेफ्टी रन’ : आरडीएसओची चमू १६ ला येणार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : महामेट्रोनागपूरमेट्रो प्रकल्पाच्या परीक्षणासाठी ‘आरडीएसओ’ची (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) चमू आता १६ फेब्रुवारीला नागपुरात येणार आहे. त्यापूर्वी बुधवारी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बुलंद शंटिंग इंजिनद्वारे रुळाची पाहणी केली आणि विकास कामांचा आढावा घेतला. गुरुवारी रात्री महामेट्रोतर्फे मेट्रोचा ‘ट्रायल रन’ घेण्यात येणार असून ‘माझी मेट्रो’ रुळावर धावताना दिसणार आहे.बृजेश दीक्षित यांनी सांगितले की, मेट्रो रेल्वेच्या ‘सेफ्टी रन’साठी आवश्यक तयारी केली आहे. त्यामध्ये ट्रॅक, ओव्हर हेड इलेक्ट्रिफिकेशन, स्टेशन आणि संबंधित कामांचा आरडीएसओतर्फे परीक्षण करण्यात येणार आहे. त्याकरिता २५ हजार व्हॉल्ट विजेचा प्रवाह सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे व्हाया डक्ट विभागात सुरक्षेच्या कारणांनी सर्व कामे थांबविण्यात आली आहेत. बुधवारी वर्धा रोडवर एअरपोर्ट मेट्रो स्टेशन ते जयप्रकाश मेट्रो स्टेशनपर्यंत दोन कि़मी. ट्रॅकवर बुलंद शंटिंग इंजिनने सेफ्टी रनचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी महामेट्रोचे प्रकल्प संचालक महेश कुमार, रोलिंग स्टॉक संचालक सुनील माथुर, कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक) जनक कुमार गर्ग, महाप्रबंधक (प्रशासन) अनिल कोकाटे आणि महामेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.आरडीएसओ चमूचे परीक्षण १६ लानागपूर मेट्रो प्रकल्पात व्हाया डक्ट विभागात (मेट्रो पूल) चीन येथून आलेली मेट्रो रेल्वे चालविण्यासाठी आरडीएसओची चमू सुरक्षा मानकानुसार काम झाले वा नाही, याच्या परीक्षणासाठी १६ फेब्रुवारीला येणार आहे. मेट्रो पूलावर रेल्वे चालवून सर्व तांत्रिक बाबींचे परीक्षण करतील.१२ हजार अधिकारी व कर्मचारी कार्यरतबृजेश दीक्षित यांनी सांगितले की, निर्धारित वेळेत नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी १२ हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ४५० ते ५०० कर्मचारी सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनवर कार्यरत आहे. कुशल कारागिरांच्या मदतीने कमी वेळेत एअरपोर्ट मेट्रो स्टेशनचे काम पूर्ण केले आहे. उर्वरित काम तीन ते चार दिवसांत पूर्ण होईल.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर