शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

‘टीप डील’ करणारे अडचणीत

By admin | Updated: February 13, 2016 02:42 IST

गुन्हेगारासोबत ‘टीप डील’ करून त्याचा बचाव करणाऱ्या घरभेदी पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे.

चौकशी सुरू : पोलीस दलात खळबळ नागपूर : गुन्हेगारासोबत ‘टीप डील’ करून त्याचा बचाव करणाऱ्या घरभेदी पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या पोलिसांची याच नव्हे तर यापूर्वीच्या अन्य प्रकरणांतही त्यांची भूमिका तपासली जाणार आहे. परिणामी ‘टीप डील’ करणारे पोलीस चांगलेच अडचणीत आले आहेत.मोक्काच्या गुन्हेगारासोबत गुन्हे शाखेतील दोन पोलिसांनी ‘टीप डील’ केल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली. शुक्रवारी दिवसभर याच वृत्ताची सर्वत्र चर्चा सुरू होती. वरिष्ठांनीही त्याची गंभीर दखल घेत या बेईमान पोलिसांची चौकशी सुरू केली. मुख्यमंत्र्यांचे ‘होम टाऊन’ असलेल्या नागपुरात वाढलेली गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी तसेच उपराजधानीला सेफ सिटी बनविण्यासाठी गुन्हेगारांचा सफाया करण्याची धडक मोहीम शहर पोलिसांनी सुरू केली आहे. ‘स्पेशल अ‍ॅक्शन प्लान’नुसार शहरातील प्रमुख गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांवर मोक्काची धडाकेबाज कारवाई करण्यात आली. त्यामुळे बहुतांश कुख्यात गुन्हेगार शहरातून पळून गेले आहेत. त्यांना हुडकून काढण्यासाठी शहर पोलीस रात्रंदिवस धावपळ करीत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालत आहेत. यातीलच एक खतरनाक गुन्हेगार पोलीस पोहोचण्यापूर्वीच तेथून पळून जात असल्याचे लक्षात आल्यामुळे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गुन्हेगाराच्या ‘संपर्क’ यादीवर नजर टाकली अन् या भ्रष्ट पोलिसांचे पाप अधोरेखित झाले. तब्बल ७२ वेळा संपर्क करून ५३ ते ५५ वेळा त्या गुन्हेगाराशी बोलणी झाल्याचे उघड झाले. ही धक्कादायक माहिती गुरुवारपर्यंत विशिष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच माहीत होती. शुक्रवारी लोकमतने यासंबंधाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित करून एकच खळबळ उडवून दिली. शहर पोलीस दलाला या प्रकरणामुळे जबर हादरा बसला आहे. दरम्यान, पोलीस आयुक्तांपासून सारेच वरिष्ठ अधिकारी गुन्हेगारीची घाण साफ करण्यासाठी प्रयत्न करीत असताना गुन्हे शाखेतील काही भ्रष्ट घाण वाढवण्यात पुढाकार घेत असल्याचे लोकमतच्या वृत्तामुळे जगजाहीर झाल्याने वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी संबंधित कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्याची कसून चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगितले. हा प्रकार अतिशय गंभीर असल्यामुळे घाईगडबडीत कारवाई करण्याऐवजी सर्व बाजू तपासूनच कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शर्मा यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)डीजींकडेही पोहोचली माहिती या गंभीर प्रकाराची माहिती पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनाही काही जागरूक नागरिकांनी कळविली आहे. ‘मिस्टर क्लीन’ प्रतिमेचे धनी असलेले आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात दणकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे पोलीस महासंचालक दीक्षित यांच्यापर्यंत प्रकरण गेल्यामुळे दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी जोरदार चर्चा दिवसभर गुन्हे शाखेत होती.