शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

यंदा कांदा रडविणार, भाव दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 11:10 AM

उन्हाळ्यात सुरुवातीला कांद्याचे भाव ८ ते १० रुपये असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक केला. तो कांदा आता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणला आहे.

ठळक मुद्देआवक कमीयंदा ५० टक्के पीक कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : किरकोळ बाजारात कांदा प्रतवारीनुसार ४० रुपये किलोपर्यंत विकण्यात येत असल्याने नेहमी शेतकऱ्यांना रडविणाºया कांद्याने आता रडविण्याचा गुणधर्म पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना दाखविला आहे. कळमना ठोक बाजारात भाव २५ ते २८ रुपये आहेत. त्यापेक्षा कमी भाव शेतकऱ्यांना मिळत आहे. त्याचा फायदा शेतकरी आणि ग्राहकांना न होता व्यापाऱ्यांना अधिक होत असल्याची परिस्थिती आहे. भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली. कळमना बाजारात गेल्या महिन्याच्या १४ ते १५ रुपये किलोच्या तुलनेत सध्या लाल कांद्याचे भाव २५ ते २८ रुपये आणि पांढऱ्या कांद्याचे ३० ते ३२ रुपयांवर पोहोचले आहेत. या तुलनेत किरकोळमध्ये भाव जास्त आहेत. किरकोळ बाजारात ४० रुपये भावामुळे ग्राहक त्रस्त आहेत. भाव आणखी वाढल्यास सुरुवात झाल्यास केंद्र शासन खरेदी करून स्टॉक केलेला कांदा बाजारात आणतील. त्यामुळे भावावर नियंत्रण येईल. याशिवाय नवीन कांदा लवकरच बाजारात येईल, असे वसानी म्हणाले.

बटाट्याचे भाव स्थिरबटाट्याचे पीक देशभरात घेतले जाते. भरपूर स्टॉक असल्यामुळे कळमन्यात वर्षभरापासून प्रति किलो भाव ८ ते १० रुपयांदरम्यान आहेत. कळमन्यात दररोज आग्रा, कानपूर, इटावा येथून २० ट्रकची आवक आहे. किरकोळमध्ये भाव दुपटीवर आहेत.

दोन महिन्यात लसणचे भाव दुप्पटदोन महिन्यांपूर्वी कळमन्यात ५० ते ६० रुपयांवर असणारे लसणचे भाव दर्जानुसार १०० ते १२५ रुपयांवर पोहोचले आहेत. महिन्यापूर्वी भाव ८० ते १०० रुपये होते. किरकोळ बाजारात १४० ते १५० रुपयांदरम्यान विक्री होत आहे. नवीन पीक फेब्रुवारी आणि मार्चमध्ये येणार असल्यामुळे ग्राहकांना लसूण जास्त भावातच खरेदी करावे लागेल, असे वसानी म्हणाले. दररोज दोन ट्रकची आवक कोटा (राजस्थान), उज्जैन, रतलाम, (मध्य प्रदेश) येथून आहे.यंदा ५० टक्के पीक कमीकळमना आलू-कांदे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी म्हणाले, गेल्यावर्षी कांद्याला भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी यंदा कमी लागवड केली. शिवाय पावसामुळे बराच कांदा जमिनीतच खराब झाला आहे. त्यामुळे यंदा कांद्याचे पीक नेहमीच्या तुलनेत ५० टक्के कमी येण्याची शक्यता आहे. शिवाय आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यातून कांद्याची आवक एक महिना उशिरा सुरू झाली आहे. सध्या दोन ते तीन ट्रक येत आहेत.उन्हाळ्यात सुरुवातीला कांद्याचे भाव ८ ते १० रुपये असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कांद्याचा स्टॉक केला. तो कांदा आता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाजारात आणला आहे. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. हा स्टॉक दिवाळीपर्यंत येण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना उन्हाळ्याच्या तुलनेत सध्या जास्त भाव मिळत आहे. कळमन्यात आठवड्यात सरासरी १५ ट्रकची आवक आहे. लाल कांदा बुलढाणा, शेगांव, मलकापूर, नांदुरा, उज्जैन (मध्यप्रदेश) येथून १० ते १२ आणि अमरावती, परतवाडा, मोर्शी येथून पांढरे कांदे २ ते ३ ट्रक येत आहेत. नवीन कांदा धुळे येथून दसऱ्याला आणि नाशिक येथील कांदा दिवाळीनंतर येईल. तसेच कर्नाटक येथील हुगळी, बेळगांव येथील कांदा महिन्यानंतर कळमनात येणार आहे. सध्या थोडा माल विक्रीसाठी येत आहे.

टॅग्स :onionकांदा