शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
2
"प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
4
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
5
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
6
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
7
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
9
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
10
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
11
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
12
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
13
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
14
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
15
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
16
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
17
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
18
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
19
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
20
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार

त्याच्यासाठी काळ आला होता पण वेळ आली नव्हती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 12:49 AM

धावत्या रेल्वेगाडीतून पडल्यानंतर सहसा कुणी जिवंत वाचत नाही. परंतु काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा प्रत्यय बुधवारी रात्री नागपूर विभागातील वरोरा रेल्वेस्थानकाजवळ आला. धावत्या रेल्वेगाडीतून पडूनही एक प्रवासी सुखरुप नागपुरात पोहोचल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.

ठळक मुद्देधावत्या रेल्वेतून पडूनही सुखरुप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धावत्या रेल्वेगाडीतून पडल्यानंतर सहसा कुणी जिवंत वाचत नाही. परंतु काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा प्रत्यय बुधवारी रात्री नागपूर विभागातील वरोरा रेल्वेस्थानकाजवळ आला. धावत्या रेल्वेगाडीतून पडूनही एक प्रवासी सुखरुप नागपुरात पोहोचल्यामुळे सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले.दिवाणसिंग प्रेम साय (५०) रा. प्रतापपूर, छत्तीसगड असे जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. त्यांचा मुलगा विजयवाडा येथील शाळेत सातव्या वर्गात शिकतो. मुलाला घेण्यासाठी ते पुतणीसह विजवाड्याला गेले होते. मुलाला घेऊन परत येत असताना १६०९३ लखनौ एक्स्प्रेसच्या बी-२ कोचमधील ५५, १६ आणि १३ क्रमांकाच्या बर्थवरून ते प्रवास करीत होते. दिवाणसिंग हे रेल्वेगाडीच्या कोचच्या दारावर उभे होते. वरोरा रेल्वेस्थानकावर अचानक त्यांचा तोल गेला. ते धावत्या गाडीतून खाली पडले. याबाबत मुलाला आणि पुतणीला काहीच समजले नाही. नागपूर रेल्वेस्थानकावर गाडी आल्यानंतर वडील दिसत नसल्यामुळे मुलगा त्याची चुलत बहीण घाबरले. त्यांनी आरपीएफ ठाणे गाठून घडलेली घटना सांगितली. लगेच आरपीएफने वरोरा येथे संपर्क साधला असता वरोरा आरपीएफने त्यांची शोधाशोध केली. अखेर ते रेल्वे रुळाशेजारी बसून दिसले. प्रथमोपचारानंतर त्यांना दुसऱ्या गाडीने नागपुरात पाठविण्यात आले. येथे आल्यानंतर त्यांना मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी उशिरा त्यांचे कुटुंबीय नागपुरात दाखल झाले. उपचारानंतर ते कुटुंबीयांसह बिलासपूरला रवाना झाले.

टॅग्स :railwayरेल्वेpassengerप्रवासी