कोंबडीचे मांस खाल्ल्याने वाघांना झाली 'बर्ड फ्लू'ची लागण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 16:55 IST2025-01-10T16:54:42+5:302025-01-10T16:55:52+5:30

Nagpur : वनमंत्री गणेश नाईक नियम मोडणाऱ्यांवर कारवाई

Tigers infected with 'bird flu' after eating chicken meat | कोंबडीचे मांस खाल्ल्याने वाघांना झाली 'बर्ड फ्लू'ची लागण

Tigers infected with 'bird flu' after eating chicken meat

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर :
गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयातीत रेस्क्यू सेंटरमध्ये 'बर्ड फ्लू'ची लागण होऊन दोन वाघ व एका बिबट्याचा मृत्यू झाला. कोंबडीच्या मटणातून त्यांना ही लागण झाली, अशी प्राथमिक माहिती आहे. याची सत्यता तपासली जाईल. खाद्य तपासून द्या, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राणिसंग्रहालयाला दिल्या आहेत. सखोल चौकशीनंतर खरे कारण समोर येईल. प्रादुर्भाव झालेल्या प्राणिसंग्रहालय तात्पुरते बंद करण्याच्या सूचना आधीच दिल्या आहेत, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले.


चंद्रपुरात एका बैठकीसाठी उपस्थित राहण्यासाठी गणेश नाईक गुरुवारी सकाळी नागपुरात दाखल झाले. यावेळी पत्रकारांशी बोलताना नाईक म्हणाले, वन खाते समजून घ्यायचे आहे. एफ. डी. सी. एम. मध्ये ७ हजार लोकांना कायम केले होते. सुधीर मुनगंटीवार यांनी कोट्यवधी वृक्षारोपणाचे उद्दिष्ट साध्य केले आहे. डीएफओ आणि मजुराची कमतरता स्वयं यंत्रसामग्री असो याचा आढावा घेतल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये त्या पद्धतीने तरतुदीची मागणी करणार आहे. अभयारण्यातील गाव उठून किंवा शेती असेल तर त्यांना अधिग्रहण करून त्यासाठी धोरण आहे. त्यात आणखी सुधारणा केली जाईल. कन्हांडल्यात वाघांचा रस्ता अडविला होता. कुणी नियमाच्या बाहेर जात असेल तर कारवाई केली जाईल, असेही नाईक यांनी स्पष्ट केले. चंद्रपूरमध्ये ईडीची धाड पडली. अभयारण्यात एवढा कोणी पैसा कमावेल आणि धाड पडेल, मला त्यात शंका आहे. 

Web Title: Tigers infected with 'bird flu' after eating chicken meat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.