शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
3
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
4
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
5
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
6
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
7
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
8
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
9
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
10
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
11
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
12
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
13
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
14
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
15
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
16
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
17
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
18
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
19
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
20
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
Daily Top 2Weekly Top 5

मिहानच्या विजेसाठी निविदा

By admin | Updated: July 1, 2014 01:06 IST

गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मिहान-सेझमधील विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) तोडगा काढला आहे. एमएडीसी ‘ओपन अ‍ॅक्सेस’मधून वीज खरेदी

ओपन अ‍ॅक्सेसमधून वीज घेणार : मुख्यमंत्र्यांची मंजुरी नागपूर : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या मिहान-सेझमधील विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) तोडगा काढला आहे. एमएडीसी ‘ओपन अ‍ॅक्सेस’मधून वीज खरेदी करून उद्योगांना कमी दरात देणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाच्या मंजुरीनंतर वीज पुरवठ्याची लघु निविदा लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती आहे. केंद्रीय परिवहन व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी रविभवनात अलीकडेच या संबंधीची बैठक घेतली होती. तर राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्या विनंतीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात या संबंधीची घोषणा केली होती. उद्योजकांनी जमीन खरेदी करताना केलेल्या करारानुसार उद्योगांसाठी प्रति युनिट २.९७ रुपये वीज मिळणार होती. पण एमएडीसीचे चुकीचे धोरण आणि अभिजित समूहाने तांत्रिक व धोरणात्मक अडचणी पुढे करून प्रकल्पातील उत्पादन आणि पुरवठा बंद केला. समूहाला कोळशाचे लिंकेज आणि विजेचे ४.५० रुपये प्रति युनिट दर हवे होते. समूहाच्या वाढीव वीजदराच्या मागणीकडे दुर्लक्ष करून एमएडीसीने महावितरणची ९ ते १० रुपये युनिट दराची वीज खरेदी करून उद्योगांना देण्यास मंजुरी दिली. या निर्णयामुळे उद्योजकांमध्ये खळबळ उडाली. येथील उद्योजकांची संघटना मिहान इंडस्ट्रीज असोसिएशनने वीज नियामक आयोग आणि हायकोर्टात धाव घेतली. हा प्रश्न एमएडीसीने सोडवावा, असे निर्देश देण्यात आले. त्यानंतरही एमएडीसीला हा प्रश्न सोडविण्यात अपयश आले. मिहानमधील अडचणी सोडविण्यासाठी गडकरी यांनी पुढाकार घेतल्याने हा प्रश्न मार्गी लागण्याची उद्योजकांमध्ये चर्चा आहे. मिहानच्या विकासातील मोठा अडथळा यामुळे दूर होणार आहे. नवीन उद्योगांची स्थापना व अस्तित्वातील उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी ओपन अ‍ॅक्सेसची वीज तातडीने मिळावी, अशी मागणी उद्योजकांनी लोकमतशी बोलताना केली. (प्रतिनिधी)